तरुण भारत

लॉकडाऊन, कर्फ्यू नाही; मास्क हवाच!

मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण : नियम डावलल्यास दंड

प्रतिनिधी / बेंगळूर

Advertisements

मागील 14 दिवसांमध्ये राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने भर पडताना दिसून येत आहे. मात्र, सुदैवाने मृत्यूदर कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी बेसावध राहू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. शिवाय राज्यात लॉकडाऊन किंवा नाईट कर्फ्यू जारी करण्याचा सध्या तरी विचार नाही. मास्क आणि सामाजिक अंतराचा नियम पाळणे आवश्यक आहे, अन्यथा दंड आकारण्यात येईल, असा
इशारा मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिला.

कोरोना रुग्णसंख्या वाढीमुळे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सोमवारी कोविड तांत्रिक सल्लागार समितीच्या तज्ञांशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, नागरिकांनी स्वतः जागरुक राहणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करून सरकारला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नये. कोविड मार्गसूचीचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

रुग्णसंख्या अधिक असणाऱया जिल्हय़ांमध्ये कोविड चाचणीचे प्रमाण वाढवावे, मोठमोठय़ा अपार्टमेंटमध्ये लस देणे, ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांना त्वरित लस देणे, असा सल्ला कोविड तांत्रिक सल्लागार समितीने दिल्याचे ते म्हणाले. सभा-समारंभांमध्ये 80 ते 90 टक्के लोक मास्कचा वापरच करत नाहीत. त्यामुळे मागे उद्भवलेल्या परिस्थितीची पुनरावृत्ती निर्माण होत आहे. त्यामुळे मास्कचा वापर, सामाजिक अंतर सक्तीचे आहे. एखाद्या वेळेस या नियमाचे पालन न झाल्यास कठोर निर्णय घ्यावा लागेल.

17 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. त्यावेळी कोणते कठोर निर्णय घ्यावेत हे ठरविण्यात येईल. मतदार यादीच्या आधारे ज्येष्ठ नागरिकांचा शोध घेऊन लस देण्यात येईल. आतापर्यंत केवळ 58 टक्के आघाडीच्या फळीतील कोरोना योद्धय़ांनी लस घेतली आहे, असेही येडियुराप्पा म्हणाले.

स्वयंसेवी संस्थांची मदत घेणार

कोविड इस्पितळे, ऑक्सिजन पुरवठा, आयसीयु विभाग आणि कोविड केअर सेंटर पुन्हा सज्ज ठेवण्यात येत आहेत. तशा सूचना अधिकाऱयांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांमध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी ग्रामीण आणि झोपडपट्टी भागात सर्व खाती, रोटरी, लायन्स क्लब यासारख्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Related Stories

कर्नाटकातील आंबा पिकाला खराब हवामानाचा फटका

Sumit Tambekar

‘विद्यागम’ला तात्पुरती स्थगिती

Patil_p

कर्नाटक पोटनिवडणूक: सतीश जारकिहोळी सर्वात श्रीमंत उमेदवार

Abhijeet Shinde

गेल्या 24 तासात राज्यात नवे 1,598 कोरोना रुग्ण

Amit Kulkarni

ऑनलाईन पोती खरेदी : शिक्षिकेची 1.13 लाखाची फसवणूक

Amit Kulkarni

विद्यार्थ्यांना 15 एप्रिलपासून मध्यान्ह आहार पुरवठा करा

Amit Kulkarni
error: Content is protected !!