तरुण भारत

व्हाईस ऍडमिरल आर. हरीकुमार यांची सी-बर्ड नाविक दल प्रकल्पाला भेट

प्रतिनिधी / कारवार

वेस्टर्न नेवल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व्हाईस ऍडमिरल आर. हरीकुमार यांनी येथून जवळच्या अरगा येथील सी-बर्ड नाविक दल प्रकल्पाला भेट देऊन रविवारी आणि सोमवारी प्रकल्पाची पाहणी केली. दक्षिण आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा आणि देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून प्रतिष्ठित आणि महत्त्वपूर्ण म्हणून गणला जाणारा सी-बर्ड नाविक दल प्रकल्प (कदंबा नौदल प्रकल्प) कारवार आणि अंकोला तालुक्यांच्या किनारपट्टीवर गेल्या काही वर्षांपासून आकार घेत आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा यापूर्वीच पूर्ण झाला असून आता प्रकल्पाचा दुसरा टप्पा आकार घेत आहे. प्रकल्पस्थळी व्हाईस ऍडमिरल आर. हरीकुमार यांचे रियल ऍडमिरल महेश सिंग यांनी स्वागत केले.

Advertisements

यावेळी हरीकुमार यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर सी-बर्ड प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी आर. हरीकुमार यांना युद्धनौकाच्या तयारीबद्दल आणि प्रकल्पस्थळी विकसित करण्यात येत असलेल्या पायाभूत सुविधांबद्दल माहिती दिली. प्रकल्पाच्या दुसऱया टप्प्यात हाती घेण्यात आलेल्या विविध कामांची पाहणीही यावेळी त्यांनी केली. त्याचबरोबर हरीकुमार यांनी प्रकल्पातील अधिकारी, सेल्स, डी. एस. सी. जवान आणि सिव्हिलीयन कर्मचाऱयांशी संवाद साधला. हरीकुमार यांनी वेस्टर्न नेवल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून 28 फेब्रुवारी रोजी सूत्रे स्वीकारली आहेत.

Related Stories

आजपासून रात्रीची संचारबंदी

Omkar B

मनपा कर्मचाऱयांच्या लसीकरणास प्रारंभ

Amit Kulkarni

संशयित कोरोनाबाधितांवरही उपचार करणे बंधनकारक

Patil_p

अस्तुली पुलानजीक ट्रक कलंडला

Omkar B

बुधवारी 37 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Amit Kulkarni

उपनयन हा महत्त्वाचा संस्कार

Amit Kulkarni
error: Content is protected !!