तरुण भारत

गरिबांच्या फ्रीजला वाढती मागणी

माठ, शीतपेये, कलिंगडाकडे नागरिकांचा ओढा : तापमानवाढीचा परिणाम

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात कडक उन्हाळा जाणवू लागल्याने तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. शहराचा पारा 34 अंशांच्या पुढे जात आहे. वाढत्या तापमान वाढीमुळे शीतपेयांसह कलिंगडे, माठांना मागणी वाढली आहे.

उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठी थंडपेयांच्या गाडय़ांवर नागरिकांची गर्दी होत आहे. शिवाय गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱया मातीच्या माठांना  मागणी वाढली आहे. बाजारात ठिकठिकाणी शहाळे, थंडपेय विक्री करणाऱया विपेत्यांकडे नागरिकांची पावले वळत आहेत. वाढत्या उन्हाने नागरिकांच्या जीवाची लाही लाही होत असून उसाचा रस, सरबत, ज्यूस, आइस्क्रिम, विक्रेत्यांकडे गर्दी वाढत आहे.

वाढत्या उष्म्यात थंडगार पाणी देणाऱया मातीच्या माठांना मागणी वाढली असून माठ विपेत्यांकडे आकारानुसार 200 रुपयांपासून 400 रुपयांपर्यंत माठ उपलब्ध आहेत. स्थानिक माठांची किंमत 100 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत आहे.  आकर्षक मातीच्या बॉटलदेखील विपेत्यांकडे उपलब्ध आहेत. त्यांनाही मागणी वाढली आहे.

विनायक गुंजीकर (माठ विक्रते)

 वाढत्या उष्म्यात गारवा देणारे थंडगार पाणी मिळविण्यासाठी मातीच्या माठाला पर्याय नाही. त्यामुळे या गरिबांच्या फ्रीजकडे श्रीमंतांचाही ओढा वाढला आहे. माठाच्या मागणीत वाढ झाली असून खानापूरसह आसाम, कोलकाता, अहमदनगर येथून माठ उपलब्ध झाले आहेत. आकारमानानुसार माठांच्या किमती 100 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत आहेत. गतवषी कोरोनामुळे मोठा फटका बसला होता. ऐन हंगामात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गतवषी सिझन वाया गेला होता.

Related Stories

अंगडी तांत्रिक महाविद्यालयात कार्यशाळा

Patil_p

परिवहनचा महसूल पुन्हा थंडावला

Amit Kulkarni

सार्वजनिक वाचनालयातर्फे समितीच्या कोविड सेंटरला 21 हजार रुपये मदत

Amit Kulkarni

वॉर्ड क्र. 4 मधून सर्वाधिक 23 उमेदवारी अर्ज

Amit Kulkarni

केरळच्या निराधाराला जीवनदीप

Patil_p

कॅम्पमधील वाल्मिकी मंदिर हस्तांतर करण्यासाठी नोटीस

Patil_p
error: Content is protected !!