तरुण भारत

सांगली : सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टला बळी पडू नका – सुवर्णा पवार

प्रतिनिधी / सांगली

कोरोना कालावधीत दि. १ मार्च २०२० ते दि. २८ फेब्रुवारी २०२१ अखेर ज्या घरातील २१ ते ७० या वयोगटातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले आहे, अशा विधवा झालेल्या महिलांना महिला व बाल विकास विभागाच्या जिजामाता, जिजाऊ या योजनेंतर्गत ५० हजार रूपये प्रति लाभार्थी मिळतील अशी पोस्ट सध्या व्हाटस्ॲपवर व्हायरल होत आहे.

Advertisements

सदरची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर ही पोस्ट खोटी व बनावट असून अशा प्रकारची कोणतीही योजना महिला व बाल विकास विभागामार्फत राबवली जात नसल्याचे सांगण्यात आले आहे. या मेसेजला नागरिकांनी बळी पडू नये असे आवाहनही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी केले आहे.

Related Stories

सांगली : सुभाषनगरमध्ये घर फोडून तीन लाखांचा ऐवज लंपास

Abhijeet Shinde

सांगली : बेवारस वाहने हटविण्यास महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने सुरुवात

Abhijeet Shinde

सांगली : पलूसमध्ये डेंग्यूसदृश साथ

Abhijeet Shinde

बजरंग गावडे यांना समाज गौरव पुरस्कार प्रदान

Abhijeet Shinde

शेगाव येथे बंद घर फोडून ३ लाख ८० हजारांची चोरी

Abhijeet Shinde

कसबे डिग्रज नळ पाणीपुरवठा योजनेस मान्यता

Sumit Tambekar
error: Content is protected !!