तरुण भारत

तेणे चक्रपाणी उद्धरीत असे

(अध्याय तिसरा)

गुरुचे शिष्यावर पुत्रवत प्रेम असते, त्याची आध्यात्मिक प्रगती पाहून ते अतिशय समाधानी होतात आणि त्याच्या अगदी अधीन होतात. हाच अनुभव जे भगवत भजन करतात त्यानाही येतो. त्यांचा स्वामीही असाच सेवकाजवळ सदैव पहारा देत असतो. भोळय़ाभाबडय़ा लोकांसाठी तर ही पर्वणीच आहे. असे अनेक भजन करत करत उत्तम भक्त झालेले आहेत. नाथमहाराज म्हणतात, ‘त्यासाठी सतसंगती हा पाया आहे.’ सत्संगाचा उपयोग विषयापासून विरक्ती साधण्यासाठी होतो. म्हणून असंग सोडून द्यावा. पहिली दृढ असंगती कोणती तर हा देह म्हणजेच मी ही समजूत! ती पूर्णपणे मनातून काढून टाकावी. मग सत्संगती म्हणजे कुणाची संगत धरावी? तर जेथे दया, मैत्री आणि विनय ही तीन लक्षणे दिसतात, त्यांची संगती करावी. अशी लक्षणे संतांच्यात पूर्णपणे दिसतात. त्यांच्या पूजनाने देवाधिदेव संतुष्ट होतो. त्यांच्या पूजनाने आपल्या अंगी विनय भाव दाटून येतो. संतांची वर्तणूक पाहून आपल्या अंगीही असेच गुण असावेत हा भाव मनात उपजतो. सत्संगतीचे महत्त्व सांगितल्यावर मुख्य परमार्थ साधण्यासाठी शुचिर्भूतपणा आवश्यक आहे. अंतःकरणात दाटलेली वासनेची मलीनता घालवण्यासाठी गुरु वाक्मयावरील नि÷ा उपयोगी येते. सोने जसे मुशीत घातले की शुद्ध होते, तसेच गुरुंच्या सांगण्याप्रमाणे वागले की, अंतःकरण शुद्धी होते. मग साधक अंतर्बाह्य शुचिर्भूत म्हणजे पवित्र होतो आणि ही पवित्रताच आपोआप परमार्थ दशेला नेऊन पोचवते. या स्थितीत त्याच्याकडून जे कर्म घडते तेच ब्रह्म होते. सत्संग आणि शुचिर्भूतता साधल्यामुळे आपल्यातल्या स्वार्थाचे पूर्ण उच्चाटन होते तर अशा स्थितीत जे काम होईल ते निःस्वार्थच असणार, मग आपण करत असलेले प्रत्येक कर्म हे देवाचेच काम होऊन जाते. साहजिकच ते काम आपल्याकडून पूर्ण करून घेण्याची जबाबदारी भगवंताची असते. यालाच कर्म ब्रह्म होणे असे म्हणतात. सतशिष्य होण्यासाठी पुढचा गुण म्हणजे मौन. त्याचे  महत्त्व काय ते पाहू. काही लोक व्रत म्हणून मौन पाळतात. पण तसे न करता ते आपोआप घडायला पाहिजे. जेव्हा मनात अनेक विचार चालू असतात त्यानुसार मनुष्य बोलत असतो म्हणजे बोलण्यासाठी मनात त्या विषयांच्या विचारांची घुसळण चालू असते ही गोष्ट सद्गुरुंच्या ध्यानात असते, मग त्या दृष्टीने ते शिष्याला उपदेश करतात. सद्गुरु सांगतात मनात ईश्वराशिवाय कोणतेही विचार न येण्यासाठी सतत त्याचेच चिंतन मनात चालू हवे म्हणजे मनात विचारांचे मौन पाळले जाईल व बोलणे आपोआपच खुंटेल. श्रीरामदास स्वामी तर ग्वाही देतात की,काहीच न करोनि प्राणी।रामनाम जपे वाणी। तेणे चक्रपाणी उद्धरित असे। मौनाच्या योगाने साधकाला परमानंदाची प्राप्ती होते. असे मौन साधण्यासाठी सद्गुरु वेदाध्ययन करायला सांगतात. सर्वांना वेदाध्ययन शक्मय नाही. त्यावर उपाय म्हणून श्रीराम किंवा श्रीकृष्ण यांचे नामस्मरण हेच दृढ मौन होय. नामाची अखंड गर्जना करत राहिले म्हणजे वेद हात जोडून पुढे उभे राहतात. देव त्यांना डोक्मयावर घेतात.

Advertisements

क्रमशः

Related Stories

‘आरोग्यदायी वृद्धापकाळ: गरज नव्या संकल्पांची-नियोजनाची

Patil_p

सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण

Patil_p

विचारदोषाची अनटोल्ड स्टोरी!

Patil_p

दाखवायच्या गोष्टी

Patil_p

देशभरात व्याघ्रमृत्यूची कारणे अस्पष्ट

Patil_p

ब्रेक्झिटचे घोडे अखेर ऍटलांटिक समुद्रात न्हाले

Patil_p
error: Content is protected !!