तरुण भारत

बॅका बंद – ग्राहकांना वीज बिलांची चिंता

मार्च महिन्यात बिल वसुलीचा तगादा ऑनलाईन बिल भरण्यासाठी प्रयत्न

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील बॅकांच्या धोरणाविरोधात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स् सातारा विभाग यांच्यावतीने देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. यामुळे बॅक बंद असल्याने वीज ग्राहकांपुढे वीज बिलांचा भरणा करण्याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. थकीत बिलाचा भार वाढत असून महावितरणाकडून वसुली मोहीम तीव्र झाली आहे. यामुळे वीज ग्राहक चिंतेत दिसत आहेत.

         1 फेबुवारीपासून थकीत वीज बिलांच्या वसुली मोहीम संपूर्ण जिह्यात सूरू आहे. वीज ग्राहकांनी बिलाचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणाकडून करण्यात येत आहे. तसेच वीज तोडणी ही केल्याने या कारवाईची धास्ती पहायला मिळत आहे. ग्राहक रांगेत उभे राहून वीज बिलांचा भरणा करत आहेत. तोच सोमवार पासून बॅकांनी देशव्यापी संप पुकारला आहे. यामुळे अनेकांचे पैसे बॅकेत अडकून पडले आहेत. आठवडय़ाचा पहिला दिवस असल्याने बॅकेत गर्दी असेल. म्हणून अनेक जण बॅक सुरू होण्याआधीच बॅकेत येत होते. मात्र बॅक बंद दिसल्याने त्यांचा गोंधळ उडाला होता. बॅक बंद तर पैसे कसे मिळणार यांची चिंता अनेकांना लागून राहिली. यांचा फटका जेष्ठ मंडळीना बसला असून महावितरणाच्या कर्मचाऱयांना विनंती करून मुदत मागितली जात आहे. तसेच काहींनी ऑनलाईन पेंमेट करण्यावर भर दिला आहे. पण जेष्ठ मंडळी ऑनलाईन पेंमेट करत नसल्याने त्यांना बॅक सुरू होण्याची वाट पहावी लागत आहे.

Related Stories

कोल्हापूर : दिवसात उच्चांकी रुग्ण १३ बळी, ४०६ बाधित

Abhijeet Shinde

कसं लढायचं आम्ही ठरवतो मंत्री मुश्रीफांचा चंद्रकांतदादांना टोला

Abhijeet Shinde

पुणे पदवीधरमधून राष्ट्रवादीचे सारंग पाटील यांची माघार

Abhijeet Shinde

शाहूपुरी पोलिसांकडून मोबाईल, दुचाकी चोरटयांची टोळी अटक

Abhijeet Shinde

कोल्हापूर : तीन हजाराची लाच स्विकारताना कॉन्स्टेबलसह होमगार्ड जेरबंद

Abhijeet Shinde

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोयना दौऱ्यावर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!