तरुण भारत

माजी केंद्रीय मंत्री,भाजप नेते दिलीप गांधी यांचे निधन

ऑनलाईन टीम / अहमदनगर : 


माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती.

Advertisements


माजी खासदार दिलीप गांधी यांचे आज (दि 17 मार्च) पहाटे निधन झाले. त्यांच्यावर दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होत. मंगळवारी त्यांची  कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. 

दिलीप गांधी हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे माजी खासदार होते. सुरुवातीला नगरसेवक म्हणून अहमदनगर महानगरपालिकेत त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. नंतर ते नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाचे नेते झाले. 1985 मध्ये ते अहमदनगर महानगरपालिकेचे उपाध्यक्ष झाले. भाजपच्या अहमदनगर जिल्हा संघटनेत सरचिटणीस, सहसचिव आणि अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत.


दिलीप गांधी 1999 मध्ये अहमदनगर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. 29 जानेवारी 2003 ते 15 मार्च 2004 या कालावधीत ते केंद्रीय जहाज वाहतूक मंत्री होते. 2004 मध्ये मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार तुकाराम गडाख यांच्याकडून गांधींना पराभवाचा धक्का बसला होता. 


त्यानंतर ते 2009 मध्ये दुसऱ्यांदा आणि 2014 मध्ये तिसऱ्यांदा लोकसभेत निवडून आले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी मात्र त्यांना तिकिट नाकारण्यात आले. त्यांच्याऐवजी सुजय विखे यांना उमेदवारी दिली गेली. मात्र तरीही नाराज न होता त्यांनी पक्षाचे काम सुरुच ठेवले. 

Related Stories

मशिदीत रूपांतरानंतर तुर्कीच्या हागिया सोफियात आज प्रथमच नमाज पठण

datta jadhav

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट, आज ४,७८० कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

मी ठामपणे सांगू शकतो की, महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकणारच ; संजय राऊतांचा दावा

Abhijeet Shinde

मोदी-ठाकरे भेटीतून मराठा आरक्षणावर नक्कीच तोडगा निघेल ; संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

Abhijeet Shinde

‘उजनी’तील घाण पाण्यामुळे 45 लाख लोकांचे आरोग्य धोक्यात

Sumit Tambekar

”अनिल देशमुखांवरील कारवाई कोर्टाच्या आदेशानुसार, याचा राजकीय अन्वयार्थ काढण्याची गरज नाही”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!