तरुण भारत

कुंभारजुवे-रामभूवनवाडा रस्ता बांधकामाचा शुभारंभ

प्रतिनिधी / तिसवाडी

कुंभारजुवे येथील रामभुवनवाडय़ावरील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत असून नुकताच त्याचा शुभारंभ कुंभारजुवे मतदारसंघातील समाजकार्यकर्ते तथा उद्योजक राजेश फळदेसाई यांच्या हस्ते करण्यात आला.

Advertisements

यावेळी फळदेसाई यांच्या समवेत कुंभारजुवेच्या सरपंच निशिता गावडे, उपसरपंच श्याम चोडणकर, पंच विलन परब, प्रशांत भंडारी व सुरेंद्र नाईक तसेच अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.

श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ केल्यानंतर बोलताना राजेश फळदेसाई म्हणाले की या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी या भागातील लोकांची मागणी होती. आजच्या काळात सुरळीत वाहतुकीसाठी रस्ते चांगले असणे ही बाब अत्त्यावश्यक झालेली आहे, कारण माणसांची ये-जा तसेच माणसांना लागणाऱया जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱया वाहनांसाठी चांगल्या रस्त्यांची गरज असते. या परिसरातील लोकांसाठी या रस्त्याची किती गरज आहे, याचे महत्व ओळखून आपण स्वखर्चाने हा रस्ता तयार करुन देण्याचे ठरविले. येत्या पंधरा दिवसात हा  काम पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी कंत्राटदार बालाजी गांवस हे प्रयत्न करतील, असेही फळदेसाई म्हणाले.

Related Stories

पर्वरी पोलीस वसाहतीतील जून्या इमारती मोडकळीस

Patil_p

पंक्चरमुळे लॉकडाऊन ऑक्सिजनवाहू टॅकरला गावकरने दिला मदतीचा हात

Amit Kulkarni

टपालातील भाजी बियांची पाकिटेच जेव्हा गायब होतात..

Omkar B

बाणावली मतदारसंघात आपली स्वताची अशी पाच हजार मते

Amit Kulkarni

क्रीडा क्षेत्रात करीअर करण्यावर विद्यार्थ्यांनी विचार करावा

Patil_p

लोकमान्य सोसायटीच्या वास्को शाखेचा वर्धापनदिन साजरा

Patil_p
error: Content is protected !!