तरुण भारत

फोंडय़ात 20 पासून द्राक्ष महोत्सव

प्रतिनिधी / फोंडा

गोवा राज्य कृषी विपणन मंडळ आणि सांगली जिल्हा कृषी उत्पन्न विपणन महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 20 ते 24 मार्च दरम्यान फोंडा येथे द्राक्ष महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. गोवा कृषी विपणन मंडळाच्या कुर्टी फोंडा येथील मार्केट यार्डमधील हा पाच दिवसांचा महोत्सव होणार असून त्यात महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्य़ातील पन्नासहून अधिक शेतकरी सहभागी होणार आहेत. 

Advertisements

सांगली कृषी विपणन महामंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी गोवा कृषी विपणन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, महाराष्ट्र मार्केटींग बोर्डचे उपाध्यक्ष सुभाष गोले व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. गोवा राज्यात अशा प्रकारचा द्राक्ष महोत्सव पहिल्यांदाच भरविण्यात येत असून सकाळी 9 ते रात्री 9 वा. यावेळेत तो खुला राहणार आहे. या महोत्सवात विविध प्रकारची दर्जेदार सफेद व काळी द्राक्षे ग्राहकांना खरेदी करता येतील. यापूर्वी सांगली कृषी विपणन महामंडळातर्फे सांगली व पुण्यात आंबा महोत्सव भरविण्यात आल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली. सांगली जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. कोरोना काळात हा व्यवसाय अडचणीत आल्याचे त्याला पुन्हा एकदा चालना देण्यासाठी गोव्यात प्रायोगिक तत्त्वावर फोंडा येथे हा द्राक्ष महोत्सव आयोजित केल्याची माहिती त्यांनी दिली. प्रकाश वेळीप यांनी गोव्यात यापूर्वी कृषी उत्पादनासंबंधी महोत्सव भरविण्यात आले होते, मात्र द्राक्ष महोत्सव पहिल्यांदाच होत असल्याचे सांगितले. गोव्यातील लोकांना द्राक्षे खायला आवडतात. या महोत्सवाचा ग्राहकांनी लाभ घेऊन शेतकऱयांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Related Stories

माशेल जन्क्शन रस्त्यावर जांभळीचे झाड कोसळले

Amit Kulkarni

म्हावळींगेत फायर रेंजमुळे घडणारे प्रकार गंभीर बंदुकीच्या गोळय़ा माणसांना लागणे दुर्दैवी.

Amit Kulkarni

आयपीएलमध्ये खेळण्यास उत्सुक, संधीचे चीज करणार : सुयश प्रभुदेसाई

Amit Kulkarni

‘संजीवनी’ कारखाना चालवणे अशक्य

Patil_p

फोंडा तालुक्यात जोरदार पाऊस

Amit Kulkarni

पंकज सायनेकरकडून नवा रेकॉर्ड प्रस्थापित

Amit Kulkarni
error: Content is protected !!