तरुण भारत

बेंगळूरचा के.रूबल ‘मि.पंचमुखी’ किताबाचा मानकरी

अवनित शेट्टी, शैलेशकुमारला उपविजेतेपद, बेळगावचा उमेश गंगणे उत्कृष्ट पोझर,

क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना व रायचूर जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मि. पंचमुखी शरीरसौष्ठव स्पर्धेत बेंगळूरच्या रूबल के. याने ’मि. पंचमुखी’ हा मानाचा किताब पटकाविला. मंगळूरच्या अवनित शेट्टीने पहिला रनर्सअप तर मंगळूरच्याच शैलेशकुमारने दुसरा रनर्सअपचा बहुमान पटकाविला. बेळगावच्या उमेश गंगणेने उत्कृष्ट पोझरचा बहुमान मिळविला. महिला फिजिकमध्ये बेंगळूरच्या अंकिता सिंगने तर पुरूष फिजिकमध्ये संदीप नवलकरने, फिजिकल चॅलेंजमध्ये सोमू तर मास्टरमध्ये प्रताप कालकुंद्रीकरने विजेतेपद पटकाविले.

रायचूर येथे झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत आयबीबीएफच्या नियमानुसार 7 वजनी गटात स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-

55 किलो गट -1) उमेश गंगणे बेळगाव, 2) ए. एन. सुरेश बेंगळूर, 3) साहीर खान विजापूर, 4) मल्लीकार्जुन रायचूर, 5) सय्यद गौस गुलबर्गा. 60 किलो गट -1) प्रताप कालकुंद्रीकर बेळगाव, 2) एम. एस. मल्लीकार्जुन बेंगळूर, 3) मनिकांत मुर्डेश्वर उत्तर कन्नडा, 4) अवनिश मंतुर धारवाड 5) जमीर गुलबर्गा. 65 किलो गट -1) अर्जुन कालीमठ धारवाड, 2) ऋषभ वशिष्ठ रायचूर, 3) सोमशेखर करवी उडुपी 4) एक्लास कुरेशी विजापूर 5) धनंजय एम. पी. दावणगेरी. 70 किलो गट -1) शैलेशकुमार दक्षिण कन्नडा, 2) पी. जी. गावडे बेळगाव, 3) मल्लीकार्जुन ए. विजापूर, 4) तानाजी चौगुले बेळगाव, 5) विनायक पी. शिमोगा. 75 किलो गट -1) वीरेश एस. एस. बळ्ळारी, 2) अफ्रोज ताशिलदार बेळगाव 3) एम. डी. मारूती दावणगेरी, 4) मुरलीधर बळळारी बेळगाव, 5) चेतन कोटीयन उडुपी. 80 किलो गट -1) अवनित शेट्टी दक्षिण कन्नडा, 2) गजानन काकतीकर बेळगाव, 3) महंमद रफिक दावणगेरी, 4) श्रवणन बेंगळूर, 5) मोतीलाल उडुपी. 85 किलो गट -1) रूबल के. बेंगळूर, 2) नित्यानंद कोटीयन उडुपी, 3) व्ही. बी. किरण बेळगाव, 4) दक्ष शेट्टी उडुपी, 5) मारूती लिंगसूर रायचूर. 85 किलोवरील गट -1) नितीन पाटील बेळगाव, 2) महंमद नुरुल्ला चित्रदुर्ग, 3) सय्यद अहमद रायचूर.

त्यानंतर मि. पंचमुखी किताबासाठी उमेश गंगणे, प्रताप कालकुंद्रीकर, अर्जुन कालीमठ, शैलेशकुमार, वीरेश एस. एस., अवनित शेट्टी, रूबल के. व नितिन पाटील यांच्यात लढत झाली. या लढतीत रूबल के. व अवनित शेट्टी यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये रूबल के.ने बाजी मारत मि. पंचमुखी हा मानाचा किताब पटकाविला. या स्पर्धेचा पहिला रनर्सअप अवनित शेट्टी तर दुसरा रनर्सअप बहुमान शैलेशकुमारने मिळविला. बेळगावच्या उमेश गंगणे याने उत्कृष्ट पोझरचा किताब पटकाविला.

फिजिकल चॅलेंजिंग गटात सोमू बळ्ळारीने प्रथम तर खलिल रायचूरने दुसरा क्रमांक पटकाविला. मास्टर्समध्ये (वयस्कर गटात) 1) प्रताप कालकुंद्रीकर बेळगाव, 2) ए. एन. सुरेश बेंगळूर, 3) श्रवणन बेंगळूर, 4) संतोष वाडकर धारवाड, 5) बाबू पुजारी उडपी यांनी यश मिळविले.

महिलांच्या स्पोर्ट्स फिजिक्स गटात 1) अंकिता सिंग बेंगळूर, 2) सुप्रिया शेनॉय बेंगळूर, 3) केतकी पाटील बेळगाव, 4) ऐश्वर्या भंडारी मंगळूर तसेच पुरूष फिजिक्समध्ये 1) संदीप नवलकर गदग, 2) आकाशकुमार उडुपी, 3) दक्ष शेट्टी उडुपी, 4) रमेश मडिवाळ गदग, 5) प्रसाद मुर्डेश्वर उत्तर कन्नडा यांनी विजेतेपद पटकाविले. प्रमुख पाहुणे माजी एमएलसी एन. एस. बोस, स्वरूपी मंजुनाथ हणगल यांच्या हस्ते विजेत्यांना चषक, मानाचा किताब, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून अजित सिद्दण्णावर, एम. गंगाधर, दिलीपकुमार, जे. निलकंठ, उमामहेश, सुधाकर, मंजुनाथ, किशोर, रघु, बसवराज अरळीमट्टी, हेमंत हावळ, सुनील राऊत, राजू नलवडे व तावडे यांनी काम पाहिले.

Related Stories

माजी मंत्री रोशन बेग यांना अटक

Omkar B

सांबरा एअरपोर्ट रोडवरील वाहतूक कोंडी ठरतेय डोकेदुखी

Amit Kulkarni

रुद्राक्ष विक्री-प्रदर्शन 14 डिसेंबरपर्यंत

Patil_p

घरावर हल्ला करणाऱया आरोपींना अटक करा

Omkar B

कुद्रेमनीतील नागरिकांची आरोग्य तपासणी

Patil_p

जीएसएस-आरपीडी कॉलेजमध्ये डॉ. वाय. के. प्रभू प्रतिमेचे अनावरण

Omkar B
error: Content is protected !!