तरुण भारत

कोरोना प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत मोदींची बैठक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

कोरोनाने प्रभावित झालेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 12 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत.

Advertisements

या बैठकीत महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, गुजरात, पंजाब, कर्नाटक, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश असेल. या प्रभावित राज्यांना भेटी देणाऱ्या उच्चस्तरीय समित्यांचा अहवालही या बैठकीत मांडण्यात येईल.

देशात लसीकरण सुरू झाल्यानंतर पंतप्रधान मोदी प्रथमच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. राज्यांच्या लसीकरणाची प्रगती आणि त्यातील अडचणींचाही ते आढावा घेणार आहेत. या बैठकीला आयसीएमआर आणि एनसीडीसीचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहू शकतात, असे आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Related Stories

तृणमूलने प्रचारात गाठली खालची पातळी

Patil_p

अत्याधुनिक संरक्षण संकुलांचे उद्घाटन

Amit Kulkarni

दिल्लीत 3,827 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

एअर इंडियाच्या लिलावाला 30 जूनपर्यंत मुदतवाढ

datta jadhav

मंत्रिमंडळ विस्ताराला संमती पण…

Patil_p

उत्तराखंडात मागील 24 तासात 473 नवे कोरोना रुग्ण; 09 मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!