तरुण भारत

चिंताजनक : महाराष्ट्रात 17,864 नवे बाधित; 87 मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील 24 तासात 17 हजार 864 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 87 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 23 लाख 47 हजार 328 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 52 हजार 861 एवढा आहे. 

Advertisements


कालच्या एका दिवसात 9,510 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आतापर्यंत 21 लाख 54 हजार 253 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 1 लाख 38 हजार 813 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.77 % तर मृत्युदर 2.26 इतका आहे. 

  • मुंबईत 15,263 ॲक्टिव्ह रुग्ण 


मुंबईत कालच्या दिवसात 1,922 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 4 जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच 1236 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3,47,581 वर पोहचली आहे. तर 3,19, 878 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांची एकूण संख्या 11,539 इतकी आहे. सद्य स्थितीत 15 हजार 263 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Related Stories

सातारकरांनो, आता गंभीर व्हावेच लागेल

Patil_p

कोरोना रूग्णांना आता घरीच ऑक्सीजन मिळणार

Patil_p

पै.अमोल साठे यांच्या मलकापूर येथील घरात चोरी

Patil_p

धरणातील पाणी नियोजनामुळे पूरस्थिती नियंत्रणात : जिल्हाधिकारी दौलत देसाई

Abhijeet Shinde

महापूर ओसरतोय, महामार्ग सुरू

Abhijeet Shinde

भाजपकडून संजय उपाध्याय लढणार राज्यसभेची निवडणूक

datta jadhav
error: Content is protected !!