तरुण भारत

‘त्या’ महिलेच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्या

महिलेच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी आंदोलन सुरूच : प्रशासनाने दखल घेण्याची मागणी

प्रतिनिधी / कारवार

Advertisements

कुटुंब नियोजन शस्त्रचिकित्सेच्यावेळी संशयास्पद मृत्यू झालेल्या त्या महिलेच्या कुटुंबीयांना भरपाई मंजूर करावी आणि महिलेच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर कारवाई करावी, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सुरू करण्यात आलेले बेमुदत उपोषण आंदोलन मंगळवारी दुसऱया दिवशीही सुरूच आहे. आंदोलनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. आंदोलनाचे नेतृत्त्व कारवार जिल्हा मासळी विक्री फेडरेशनचे अध्यक्ष आणि सदाशिवगड ग्रा. पं. चे माजी अध्यक्ष राजू तांडेल करीत आहेत. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे महिलेच्या मृत्यू प्रकरणाची दखल घ्यावी व मागण्यांची पूर्तता आठ दिवसात करा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. तथापि जिल्हा प्रशासनाने किंवा अन्य संबंधितांनी मागण्यांची दखल न घेतल्यामुळे बेमुदत उपोषणाशिवाय अन्य पर्याय उरला नव्हता, असे तांडेल यांनी सांगितले.

आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याद्वारे राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात असे म्हणण्यात आले आहे की, 3 सप्टेंबर 2019 रोजी येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात कुटुंब नियोजन शस्त्रचिकित्सेच्यावेळी गरीब आणि मागासवर्गीय मच्छीमारी समाजातील कोडीबाग-कारवार येथील सर्वोदयनगरमधील गीता शिवनाथ बानावळी या महिलेचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. किम्समधील डॉ. शिवानंद कुडतळकर आणि डॉक्टर व कर्मचाऱयांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच गीताचा मृत्यू झाला होता. गीताचे पती शिवनाथ बानावळी यांनी कारवार शहर पोलीस ठाण्यात डॉ. कुडतळकर यांच्या विरोधात रितसर तक्रार दाखल केली आहे. संशयास्पद मृत्यू प्रकरण घडून सात महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. तरीसुद्धा जिल्हा प्रशासन किंवा आरोग्य खात्याने मृत्यूचे नेमके कारण काय? याचा उलगडा केला नाही ना मयत महिलेच्या कुटुंबीयांना भरपाई मंजूर केलेली नाही.

प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

दरम्यान किम्सचे डीन डॉ. गजानन नायक, डॉ. शिवानंद कुडतळकर, डॉ. नवीन, डॉ. अरुणाश्री, डॉ. मंजुनाथ यांनी हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न केला असा आरोप करून निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरताच कारवार जि. पं. चे तत्कालिन मुख्य कार्यदर्शी एम. रोशन यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञांचा समावेश असलेल्या चौकशी समितीची स्थापना करण्यात आली. चौकशी समितीचा निष्कर्ष अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. दोषी कोणी? अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. दोषी कोण? अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. आणि म्हणूनच सत्य काय ते जाणून घेण्यासाठी, मृत्यूची नेमकी कारणे कोणती? आणि मयत महिलेच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी बेमुदत आंदोलन छेडण्यात येत आहे. किमान आता तरी गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी  निवेदनात करण्यात आली आहे.

Related Stories

रोहन कुपेकर स्मृती चषक फुटबॉल स्पर्धा 31 रोजी

Amit Kulkarni

क्लोजडाऊनमुळे बेळगाव पासपोर्ट कार्यालय बंद

Amit Kulkarni

खानापूर मलप्रभा नदीत वडगावचा युवक बुडाला

Rohan_P

कर्नाटक बिटकॉइन घोटाळ्याचा सुत्रधार हॅकर श्रीकी ‘बेपत्ता’

Sumit Tambekar

प्रामाणिकपणे-निष्ठेने काम करू

Amit Kulkarni

किल्ल्यांमुळे तालुक्यात शिवसृष्टी अवतरल्याचा भास

Amit Kulkarni
error: Content is protected !!