तरुण भारत

कंग्राळी खुर्द येथे बलिदान मासला प्रारंभ

वार्ताहर / कंग्राळी खुर्द

येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखेतर्फे धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास (फाल्गुन शुक्ल प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या) या दरम्यान शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते गांभीर्याने आचरणात आणतात. यानिमित्त गावच्या प्रवेशद्वारातील शिवाजी महाराज चौकामध्ये धर्मवीर संभाजी महाराज यांच्या तैलचित्राचे पूजन करण्यात येते. यावेळी शिवप्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आर. आय. पाटील आणि ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालून पूजन केले.

Advertisements

  महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून बलिदान मासाला सुरुवात केली.

शिवमूर्तीचे पूजन ग्रा. पं. सदस्य राकेश धामणेकर यांने केले. यावेळी ग्रा. पं. सदस्य प्रशांत पाटील, यशोधन तुळसकर, कल्लाप्पा पाटील, बाळू धामणेकर, विनायक कम्मार उपस्थित होते.

प्रेरणा मंत्राने सुरुवात झाली. यावेळी धर्मवीर संभाजी महाराजांचे श्लोक आणि आरती झाली. ध्येयमंत्राने सांगता झाली. यावेळी शिवप्रतिष्ठानचे मनोहर पाटील, महादेव दिंडे, परशराम पाटील, विनायक पाटील, सागर पाटील, राजू बाळेकुंदी, अमित आडाव, प्रकाश पाटील, अजय पाटीलसह शिवप्रेमी नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते. 

Related Stories

पिरनवाडीतील 86 जणांचे स्वॅब पाठविले तपासणीसाठी

Patil_p

बेन्नाळीत गळफासाने दोघांची आत्महत्या

Patil_p

सलग चौथ्या दिवशीही शास्त्रीनगर येथे शोधमोहीम

Patil_p

सर्किट हाऊस-जुने भाजीमार्केट रस्त्यावर वाहतूक कोंडी

Patil_p

बेळगाव जिल्हा स्केटिंगपटूंची निवड

Amit Kulkarni

शिवराज्याभिषेक दिन साधेपणाने साजरा

Amit Kulkarni
error: Content is protected !!