तरुण भारत

नंदगड गावातील गटारीमधून घाणीचे साम्राज्य

सर्वत्र दुर्गंधी : जनतेच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्मयता

वार्ताहर / नंदगड

Advertisements

नंदगड गावातील अनेक गल्लीतील गटारीत घाणीचे साम्राज्य पसरले असून काही ठिकाणी कचरा कुजल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून जनतेच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्मयता निर्माण झाली आहे.

नंदगड गाव खानापूर तालुक्मयातील महत्त्वाचे गाव म्हणून ओळखले जाते. गावात सुमारे 9000 पर्यंत लोकसंख्या आहे. तर परिसरातील 30 ते 40 गावांच्या लोकांचा रोजचा संपर्क येथे असतो. गावाला विकासाच्या बाबतीत अनेक पुरस्कार मिळाले असल्याचा गाजावाजा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र बऱयाच ठिकाणच्या गटारीत घाणीचे साम्राज्य पसरले असून ठिकठिकाणी गटारीतून घाण पाणी साचले आहे.

घाणीचे साम्राज्य पसरलेल्या ठिकाणी त्वरित स्वच्छता करणे गरजेचे होते. पण याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याने दुर्गंधीत आणखीनच भर पडत चालली आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय खासगी दवाखान्यात रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्मयात येत आहे.

तीन वर्षांपूर्वी घाण साचलेल्या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी दोन व्यक्तींची नेमणूक करण्यात आली होती. त्या व्यक्तींकडून ग्रामपंचायतीमार्फत स्वच्छता केली जात होती. परंतु अलीकडे स्वच्छता करणारी माणसे दिसून येत नाहीत. त्यामुळे स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचे आढळून येत आहे. स्वच्छ आणि सुंदर गाव करायचे असेल तर गटारी स्वच्छ करणे तितकेच गरजेचे आहे. ग्रामपंचायतीने त्वरित गटारींची स्वच्छता न केल्यास ग्रामस्थांना आता आंदोलनाचा मार्ग हाती घ्यावा लागणार आहे.

कलाल गल्लीतील गटारीत घाणीचे साम्राज्य

कलाल गल्लीतील शेवटचे टोक म्हणून ओळखल्या जाणाऱया कोंडवाडय़ाजवळील गटारीमध्ये घाण पाणी, कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या, फाटके कपडे पडलेले दिसून येत आहेत. ते कुजल्याने घाण वास येत आहे. या रस्त्यावरून नेहमीच मोठी वर्दळ असते. गावातील जनतेबरोबरच परिसरातील लोक या रस्त्यावरून ये-जा करत असतात. या गटारीतील स्वच्छता करणेही तितकेच गरजेचे आहे.

Related Stories

लोकमान्यतर्फे आज नक्षत्रांचे देणे कार्यक्रम

Patil_p

लाभार्थींनीच भरावी लागणार आश्रय घरासाठी वाढीव रक्कम

Patil_p

न्यायाधीशांकडून खडेबाजार पोलिसांची खरडपट्टी

Amit Kulkarni

मुख्यमंत्र्यांच्या दौऱयामुळे अधिकाऱयांची लगबग

Amit Kulkarni

शेडेगाळीत भरदिवसा घरफोडी

Amit Kulkarni

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीतील समितीच्या उमेदवारांना विजयी करा

Amit Kulkarni
error: Content is protected !!