तरुण भारत

भाषिक अल्पसंख्याक महामंडळाचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन

या अधिवेशनातच प्रश्न निकालात काढण्याचे आश्वासन : तात्काळ निर्णय घेऊन संस्थांना दिलासा देण्याचे मांडले म्हणणे

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

भाषिक अल्पसंख्याक फेडरेशन महामंडळ यांच्यावतीने बेंगळूर येथे शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांची विधानसभेत भेट घेण्यात आली. यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले. आमदार अरुण शहापूर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले आहे. कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षण संघाने रोस्टर पद्धत उठविली नाही तर संस्था चालविणे अवघड जाणार आहे. त्याचबरोबर अनेक शिक्षकांना त्याचा फटका बसणार आहे. त्यांचे वयही निघून जाणार आहे. तेव्हा रोस्टर पद्धत उठविणे महत्त्वाचे असल्याचे यावेळी त्यांना सांगण्यात आले.

यापूर्वी अनेक वेळा या संदर्भात निवेदने दिली आहेत. न्यायालयाने आदेशही दिला आहे. त्या आदेशाचे पालन करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शिक्षणसंस्था आणि शिक्षकांचा फायदा देखील होणार आहे. तेव्हा हा विषय अत्यंत गांभीर्याने आणि तात्काळ निर्णय घेऊन शिक्षक व शिक्षण संस्थांना दिलासा द्यावा, असे आमदार अरुण शहापूर यांनी सांगितले.

शिक्षणमंत्र्यांना यावेळी शिष्टमंडळाने अत्यंत मुद्देसुद माहिती दिली. त्यामुळे शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी या अधिवेशनातच हा प्रश्न निकालात काढला जाईल, अशी ग्वाही दिली आहे. अरुण शहापूर यांनी आजपर्यंत जे प्रयत्न केले आहेत ते मोलाचे आहेत. या प्रयत्नांबद्दल संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

या शिष्टमंडळामध्ये दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे संचालक पी. पी. बेळगावकर, फेडरेशनचे उपाध्यक्ष सी. ई. धुमाळ, सचिव पिराजी मजुकर, मार्कंडेय हायस्कूलचे संचालक ऍड. एम. जी. पाटील, लोंढा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन नेसरीकर, विनय महाळंक, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे संचालक सुरेश कळ्ळेकर, विश्वभारत सेवा समितीचे संचालक सागर नंदिहळ्ळी, किसान प्रसारक मंडळ भालकी-बिदरचे प्रा. धोंडीराम बिरादर, संतोष मेलगे यांच्यासह इतर शिक्षक उपस्थित होते. 

Related Stories

जिल्हय़ात ब्लॅक फंगसची रुग्णसंख्या 43

Amit Kulkarni

घरकुलासाठी 50 एकर जमीन ताब्यात घेणार

Patil_p

तंत्रज्ञान, उपग्रहांद्वारे देशाची प्रगती शक्य

Patil_p

उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आज बेळगावात

Patil_p

येळ्ळूरमध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळय़ास प्रारंभ

Amit Kulkarni

नारायणराव जाधव ट्रस्टतर्फे डॉक्टर्सचा सत्कार

Patil_p
error: Content is protected !!