तरुण भारत

शेतमजूरांना शिवी दिल्याने सख्ख्या भावाचा खून

भावाकडूनच सख्या भावाचा खून

प्रतिनिधी / मिरज

Advertisements

शेतमजूरांना शिवी दिल्याचा राग मनात धरुन सख्ख्या भावाच्या डोक्यात लोखंडी पार मारुन खून केल्याची घटना करोली (एम) येथे मंगळवारी रात्री घडली. मनोज वसंत देशमुख (वय 42) असे खून झालेल्या व्यक्तीचे नांव आहे. याप्रकरणी नितीन वसंत देशमुख (वय 40) याला मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, मयत मनोज देशमुख आणि आरोपी नितीन देशमुख हे दोघे सख्खे भाऊ असून, दोघेही दारुडे आहेत. सदर दोघांमध्ये तीन एकर शेती आहे. त्यांच्या वडिलांनी दोघांना दीड-दीड एकर शेतजमीन वाटून दिली आहे. नितीन याने शेतात द्राक्षबाग लावली असून, मयत मनोज हा नशेखोर होता. तो वारंवार नितीन याला किरकोळ कारणातून शिवीगाळ करीत असे. घरात वारंवार भांडणही काढत असे.

मंगळवारी सकाळी मनोज हा नितीन याच्या शेतात आला. त्याने तेथे काम करणाऱ्या शेतमजूरांना शिवीगाळ केली. या शेतात काम करायचे नाही, असे म्हणून शेतमजूरांना हकलून लावले. नितीन याने याचा जाब विचारला असता मनोज आणि नितीन यांच्यात सकाळी भांडण झाले. रात्री साडेदहाच्या सुमारास दोघेही दारु पिऊन घरी आले.

सकाळच्या वादावादीवरुन पुन्हा त्यांच्यात भांडण झाले. यावेळी नितीन याने शेजारी पडलेली लोखंडी पार घेऊन मनोजच्या डोक्यात मारली. तसेच लोखंडी रॉडही डोक्यात घातला. या मारामारीत मनोज याच्या डोक्याला गंभीर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.

Related Stories

मटका धाडीत 1 लाख 22 हजार रुपये जप्त

Rohan_P

सांगली : भाजापीला खरेदी सरकारने करावी

triratna

मिरजेत पोलिस स्टेशनसमोरच दोघांवर खूनी हल्ला

triratna

नागठाणेत काँग्रेसच्या नागेश्वर पॅनेल येथील दोन जागा बिनविरोध

triratna

“अनिकेतचा मृतदेह माझ्या समोर जाळला” अनिकेत कोथळे खून प्रकरणातील प्रत्यक्ष साक्षीदार अमोल भंडारे याची साक्ष

triratna

कणबर्गी येथे मध्यरात्री जुगारी अड्डय़ावर छापा

Rohan_P
error: Content is protected !!