तरुण भारत

तिसऱया दिवशी सेन्सेक्स 562 अंकांनी कोसळला

निफ्टीमध्ये 189 अंकांची घसरण – सार्वजनिक बँकांचे समभाग प्रभावीत

वृत्तसंस्था / मुंबई

Advertisements

चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशी बुधवारी भारतीय भांडवली बाजार 562 अंकांनी कोसळला आहे. दिवसभरातील कामगिरीनंतर सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी फक्त चार कंपन्या वगळता अन्य सर्व कंपन्या घसरणीसह बंद झाल्या आहेत. तसेच प्रमुख कंपन्यांमधील आयटीसी, इन्फोसिस, एचडीएफसी आणि टीसीएस यांचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत.

दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीनंतर दिवसअखेर सेन्सेक्स 562.34 अंकांनी घसरुन निर्देशांक 49,801.62 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 189.15 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 14,721.30 वर बंद झाला आहे. निफ्टीमधील सर्व क्षेत्रातील निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत. ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स 50,561.12 अंकांनी उच्चांकी पातळीवर राहिला होता.

दिवसभरानंतर सर्वाधिक 3.77 टक्क्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे समभाग घसरले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये आयटी क्षेत्रातील कंपन्यांपैकी आयटीसी, इन्फोसिस, एचडीएफसी आणि टीसीएस यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हच्या निर्णया अगोदरच जागतिक पातळीवरील प्रभाव सेन्सेक्स आणि निफ्टीमधील कामगिरीवर झाल्याचे पहावयास मिळाले आहे. यासोबतच भारतामध्ये नव्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या कारणामुळे त्याचा काहीसा नकारात्मक परिणाम गुंतवणूकदारांवर होत असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. यामुळे येत्या काळात शेअर बाजार कोणता कल घेणार ही बाब नमूद करणे कठीण असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

कच्च्या तेलाच्या दरात घसरण

आशियातील शांघाय, हाँगकाँग, टोकीयो आणि सियोलच्या बाजारात घसरणीचे सत्र राहिले असल्यामुळे याच दरम्यान जागतिक तेल बाजारात बेंट क्रूड 0.23 टक्क्यांच्या घसरणीसह 68.23 अमेरिकन डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.

Related Stories

‘आयपीओं’चा 2021 मध्ये राहणार धमाका

Omkar B

सिडबी डिजिटल प्लॅटफॉर्म सादर करणार

Patil_p

खराब सुरूवातीनंतर शेअर बाजार तेजीसह बंद

Patil_p

बजाज ऑटोच्या वाहन विक्रीत घट

Patil_p

चार दिवसांच्या तेजीला पाचव्या दिवशी ब्रेक

Patil_p

जागतिक संकेतामुळे सेन्सेक्समध्ये 600 अंकांची वाढ

Patil_p
error: Content is protected !!