तरुण भारत

भय इथले संपत नाही….

प्रशांत चव्हाण/ गुहागर

मध्यरात्रीची वेळ… जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून गुहागर तालुका प्रशासन, पाटपन्हाळे स्थानिक प्रशासन यांना दूरध्वनी आला, शृंगारतळीत कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. तालुका प्रशासनासह पाटपन्हाळे ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यांची तारांबळ उडाली. कोरोना रुग्ण आढळलेल्या घराला वेढा, बैठकांमधून उपाययोजनांची खलबते, व्यापाऱयांसह नागरिकांमध्ये दहशत, अशा काहीशा भयाण वातावरणात नेहमी माणसांनी धावणारी, पळणारी शृंगारतळी स्तब्ध झाली. 18 मार्च 2020चा हा दिवस कोरोनाच्या भीतीने आजही शृंगारतळीवासियांच्या मनावर कोरलेलाच आहे.

Advertisements

  गेल्यावर्षी 2020मध्ये जानेवारी महिन्यापासूनच कोरोनाचा विळखा बसण्यास सुरुवात झाली होती. याच दरम्यान काही तरुणांचा समुह कतारमधून मायदेशी आला होता. यामध्ये एक तरुण रत्नागिरी जिह्यातील गुहागर तालुक्यातील आपल्या शृंगारतळी  गावी आला होता. या तरुणाला त्रास सुरु झाल्याने तो प्रथम शृंगारतळीतील स्थानिक डॉक्टरांकडे गेला. त्याला सुरुवातीला तालुका शासकीय रुग्णालयात व नंतर जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिह्यातील पहिला कोरोना रुग्ण म्हणून त्याची नोंद झाली. येथूनच जिह्यात कोरोनाची दहशत सुरु झाली. जिह्यात नाकाबंदी करण्यात आली. कन्टेनमेंट झोन म्हणून शृंगारतळीला यानिमित्ताने टीळा लागला. तालुका प्रशासनासह पाटपन्हाळे ग्रामपंचायतीची खऱया अर्थाने कसोटी लागली ती आजतागायत.

  शृंगारतळी ही गुहागर तालुक्याची सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने येथे नेहमी वर्दळ असते. मात्र कोरोनाचा रुग्ण आढळल्याने शृंगारतळी थबकली. सर्वत्र शुकशुकाट, सर्व व्यवहार बंद, वाहतूक बंद. शृंगारतळीसह गुहागर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून ज्या उपाययोजना राबविण्यात आल्या व त्यासाठी जी अथक मेहनत घेण्यात आली त्याला तोड नाही. लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर येथील व्यवहार सुरळीत असले तरी येथील स्थानिक प्रशासन कोरोनावर उपाययोजना राबवण्यासाठी आजही सतर्क आहे

Related Stories

दहा दिवसात ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा उघड करणार

datta jadhav

नागठाणेत शौचालयातील मैला थेट ओढ्यात, कारवाईची मागणी

Abhijeet Shinde

दहावी – बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

Rohan_P

सातारा : ट्रक पलटी होऊन एकजण जखमी

Abhijeet Shinde

चाळीस नागरिकांना दिला डिस्चार्ज ; 330 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

Abhijeet Shinde

अनलॉक होताना मोठा दिलासा; 461 बाधित

datta jadhav
error: Content is protected !!