तरुण भारत

स्वातंत्र्यसैनिक फ. य. प्रभुगावकर यांचे निधन

प्रतिनिधी / काणकोण

पैंगीणच्या श्री श्रद्धानंद विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक फटी यशवंत उर्फ फ. य. प्रभुगावकर (वय 87 वर्षे) यांचे 17 रोजी मडगाव येथे अल्पआजाराने निधन झाले. त्याचदिवशी पैंगीणच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आर्किटेक्ट योगेश प्रभुगावकर यांचे ते वडील होत. त्यांच्यापश्चात पत्नी हंसा, भाऊ प्रेमानंद, स्नुषा आणि नातवंडे असा परिवार आहे. शिक्षणतज्ञ रमेश सप्रे यांचे ते व्याही होत.

Advertisements

1967 साली पैंगीणच्या श्रद्धानंद विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून रूजू होण्याअगोदर त्यांनी माशे येथील श्री निराकार विद्यालय तसेच पर्वरीच्या शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले. मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयात शिक्षण घेताना काही काळ दै. लोकसत्तामध्ये त्यांनी योगदान दिले होते. 18 जून, 1955 रोजी कारवारला माध्यमिक शिक्षण घेत असताना रामदास फेणे यांच्या प्रेरणेतून त्यांनी म्हापसा येथे सत्याग्रह केला होता आणि त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता.

गुरुवर्य रामदास पैंगणकर यांचे शिष्य असलेल्या फ. य. प्रभुगावकर यांनी त्यांचाच आदर्श स्वीकारून 1967 साली मुख्याध्यापकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर 67-68 साली अकरावीच्या वर्गासाठी पुणे शालांत मंडळाची मान्यता मिळविली. त्यांनी मुलांना बचतीची सवय लागावी यासाठी 1972 साली संचयिकेची स्थापना केली. 1980 साली पालक-शिक्षक संघाची स्थापना केली. शाळा हे दुसरे घरच मानून वागणाऱया फ. य. प्रभुगावकर यांनी श्रद्धानंदला वक्तृत्व, कथाकथन, लोकनृत्य, क्रीडा, मल्लखांब अशा विविध क्षेत्रांत नाव कमावून दिले तसेच गोव्यातील एक अव्वल शाळा म्हणून नावलौकिक मिळवून दिला.

1995 साली सेवानिवृत्त झाल्यानंतर बरीच वर्षे त्यांनी संस्थेचे अध्यक्षपद, व्यवस्थापक अशा जबाबदाऱया स्वीकारल्या. त्यांच्या कारकिर्दीत श्रद्धानंदचा सुवर्णमहोत्सव, अमृतमहोत्सव साजरा झाला. शाळा इमारतीचा विस्तार झाला. ते एक कलापेमी, कुशल संघटक, प्रशासक आणि शिस्तीचे भोक्ते होते. ते एक उत्कृष्ट वाचक आणि मराठीचे अभिमानी होते. त्यांनी बालभवन, राष्ट्रीय बचत संघटना, अखिल गोवा मराठी माध्यमिक विद्यालय संघ, गोवा मुख्याध्यापक संघटना, साने गुरूजी कथामाला अशा अनेक संस्थांचे प्रतिनिधीत्व केले. साने गुरूजींच्या श्यामची आई या पुस्तकाचे त्यांनी कोकणात भाषांतर केले होते. प्रभुगावकर यांच्या निधनाने एक सच्चा स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ काळाच्या पडद्याआड गेला असल्याच्या प्रतिक्रिया त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या चाहत्यांनी व्यक्त केल्या.

Related Stories

सोमवारी भारत बंदचे आयोजन

Amit Kulkarni

बाद फेरीच्या प्रवेशासाठी प्रखर स्पर्धा; आज गोवा-नॉर्थईस्ट लढत

Amit Kulkarni

राज्यात 8 जणांच्या कोविड मृत्यूस मुख्यमंत्रीच जबाबदार- संजय बर्डे

Patil_p

सुरेंद्र वसंत सिरसाट निवर्तले

Amit Kulkarni

साळावलीच्या जलाशयात बेकायदा रेती उपसा

Omkar B

क्रीडा भारती गोवातर्फे ज्येष्ठ खेळाडूंचा सत्कार

Amit Kulkarni
error: Content is protected !!