तरुण भारत

पणजी मनपा प्रभाग 21 मध्ये वैष्णवी उगाडेकरचा घरोघरी प्रचार

प्रतिनिधी/ पणजी

पणजी महानगरपालिकेच्या प्रभाग 21 मधील उमेदवार वैष्णवी शैलेश उगाडेकर यांनी प्रचाराचा धुमधडाका लावल्याचे दिसून येत असून रोज त्या आपल्या कार्यकर्त्यांसह घरोघरी प्रचार करत आहेत. त्यांचे निवडणूक चिन्ह बाहुली आहे. आपल्याला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून लोकांना प्रभागाच्या नेतृत्वामध्ये बदल हवाय, म्हणून आपल्याला मोठा पाठिंबा मिळत आहे, असे सर्वांत युवा उमेदवार असलेल्या वैष्णवी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.

Advertisements

 गेल्या पाच वर्षांत या प्रभागामध्ये विकास झालेला नाही. युवकांना प्रोत्साहन  व संधी देण्याचे काम झाले नाही. आता प्रभाग क्र. 21 ला आदर्श प्रभाग बनविण्यासाठी आपण निवडणुकीत उतरले आहे. समाजसेवेची आवड पुर्वीपासून असल्याने नगरसेवक म्हणून काम करताना लोकांना मदत करण्यासाठी आणखी संधी मिळणार आहे. असेही त्या म्हणाल्या

 गेल्या काही वर्षांपासून त्या असिसस्टेन्सिया गोवा या संस्थेमार्फत ज्येष्ठ, वयोवृद्धांसाठी तर चाईल्ड लाईन या गरीब मुलांसाठी कार्यरत संस्थेत टीम सदस्य म्हणून कार्यरत आहेत. कचरा हटवून गोव्यात स्वच्छता राखण्यासाठी कार्यरत असलेल्या वन हेल्प फाऊंडेशनच्या स्वच्छता मोहिमांमध्ये योगदान दिले आहे. सेरेंडीपीटी फेस्टिव्हलमध्ये योगदान दिले आहे. युवा कार्यकर्त्या असलेल्या वैष्णवी यांचे वडिल स्व. मनोहर पर्रीकर यांचे ओएसडी म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते. त्यावेळी भाईंच्या सहकार्याने  वडिलांनी लोकांची अनेक कामे केली होती, त्याचा फायदाही आपल्याला ही निवडणूक जिंकण्यासाठी होणार आहे, असा विश्वासही त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

युवकांचे सक्षमीकरण, गटार स्वच्छता, कचरा उचल, प्रभागामध्यील प्रत्येकाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रयत्न, मुलांसाठी-युवकांसाठी आवश्यक असलेले खास दिवस साजरे करणे, इको प्रेंडली पद्धतीने उत्सव साजरे करणे, युवकांपासून वयोवृद्धांच्या सर्व विषयांकडे गांभीर्याने पाहून कृती करणे, युवकांमधील क्रीडा, सुदृढता व अन्य कौशल्याला संधी मिळवून देणे, महिलांच सक्षमीकरण, रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण, भूमिगत वीज वाहिन्यांचे काम पूर्ण करणे, भटक्या जनांवरांपासून प्रभागातील लोकांचे संरक्षण करण्यासाठी एनजीओमार्फत प्रयत्न करण्याचे आश्वासन  त्यांनी आपल्या मतदारांना दिले आहे.

Related Stories

उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांना पितृशोक

tarunbharat

राज्यात 8 जणांच्या कोविड मृत्यूस मुख्यमंत्रीच जबाबदार- संजय बर्डे

Patil_p

वीज ट्रान्समिशन प्रकल्पासंबंधीच्या बैठकीत गदारोळ

Patil_p

ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत विवानला विजेतेपद

Omkar B

राममंदिर भूमिपूजनदिनी घरोघरी गुढय़ा उभाराव्या

Omkar B

कुंकळीत सुरक्षा रक्षकाचा खून

Omkar B
error: Content is protected !!