तरुण भारत

मर्जीनुसार न वागणाऱया अधिकाऱयांचे खच्चिकरण

गोवा फॉरवर्डकडून सरकारी कृत्याचा निषेध

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

स्वतःच्या मर्जीनुसार न वागणाऱया अधिकाऱयांची बदली करून सरकार कर्तव्यदक्ष अधिकाऱयांवर अन्याय करत आहे, त्यांचे खच्चीकरण करत आहे, असा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष किरण कांदोळकर यांनी केला आहे.

पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी आमदार विनोद पालयेकर यांचीही उपस्थिती होती. पाच पालिकांची निवडणूक रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने पाठीमागून काठी हाणल्यानंतर सरकार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची अवस्था दयनीय बनली आहे. परंतु आपल्या चुकीचे खापर कर्तव्यदक्ष अधिकाऱयांच्या माथी फोडून सरकारने तो मी नव्हेच ची भूमिका घेत हात वर केले व आता अशा अधिकाऱयाची बदली करण्याचे प्रयत्न चालले असल्याचे कांदोळकर यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पालिका संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी राखीवतेच्या मुद्यावर एक चांगला निर्णय दिला आहे. त्यामुळे मी मी म्हणणाऱया अनेकांना घरी बसावे लागले आहे, हे खरे असले तरीही असंख्य ओबीसी तसेच महिला उमेदवारांना न्याय मिळाला, निवडणूक लढविण्याची संधी प्राप्त झाली आहे. परंतु हेच सरकारला रूचलेले नाही. त्यातून सदर अधिकाऱयाने आपली मर्जी राखली नाही, असा आरोप करत आता त्यांची उचलबांगडी करण्याचे प्रयत्न होत आहेत. अशाप्रकारे जो अधिकारी मर्जीनुसार वागणार नाही, त्याला अशीच वागणूक देत राहणार का? असा सवाल कांदोळकर यांनी उपस्थित केला. या पालिका आरक्षणाच्या माध्यमातून पिळर्णकर यांनी बहुजन समाजाला जो न्याय दिला आहे त्यासाठी फॉरवर्डतर्फे आपण त्यांचे अभिनंदन करतो. तसेच या आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊन लोकशाही म्हणजे काय असते ते समस्त गोमंतकीयांना दाखवून देणारे गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांचेही अभिनंदन करतो, असे कांदोळकर म्हणाले. अशा अधिकाऱयाची बदली करून सरकार त्यांच्यावर सूड उगवत असेल तर तो केवळ पिळर्णकर यांच्यावरच नव्हे तर समस्त बहुजन समाजावर अन्याय असेल, असे कांदोळकर म्हणाले. अशाप्रकारे सरकारच्या दडपशाहीला बळी पडणाऱया सर्व अधिकाऱयांनी या प्रकारातून अनुभव घ्यावा व सावध व्हावे, असा सल्ला कांदोळकर यांनी दिला.

Related Stories

मुरगाव तालुक्यात यंदा भाजपाला विजयासाठी शिकस्त करावी लागणार

Amit Kulkarni

गोवा डेअरीचा सरकरने संजिवनी साखर कारखाना करू नये

Amit Kulkarni

मे महिना ठरला ‘काळा महिना’

Omkar B

गोव्याचे दोन्ही ज्युनियर्स संघ राष्ट्रीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेच्या उप-उपान्त्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

पुण्यातील अभिनेत्रीचा गोव्यात अंत

Amit Kulkarni

कोलवाळ राममंदिरात रामजन्म सोहळा साजरा

Amit Kulkarni
error: Content is protected !!