तरुण भारत

दहावी-बारावी उत्तीर्णतेचा निकष 35 ऐवजी 25 टक्के?


मुंबई / ऑनलाईन टीम

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. राज्य परीक्षा नियोजन समितीने दहावी-बारावीच्या उत्तीर्णतेचा निकष 35 टक्क्यांऐवजी 25 टक्के करण्याच्या शिफारशीवर गांभीर्याने विचार करणे सुरू केले आहे. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता २०२०-२१ या सत्रात अतिशय कमी कालावधीसाठी शालेय वर्ग भरले. याचा विचार करून23 एप्रिल ते 21 मे बारावीच्या व २29 एप्रिल ते 20मे दहावीच्या परीक्षा घेण्याचे ठरल्यानंतर त्याबाबतचे स्वरूप ठरवण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने परीक्षा नियोजन समितीची स्थापना केली आहे.

Advertisements

राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेत या समितीत माजी शिक्षण संचालक डॉ. वसंत काळपांडे व अन्य तज्ज्ञ आहेत. तीस लाख विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेणे शक्यच नसल्याने दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पार पडेपर्यंत नियोजन समितीकडून राज्य मंडळाला सूचना केल्या जाणार आहेत. या सूचना विचारात घेऊन दोन्ही परीक्षांचे कालानुरूप नियोजन होणार आहे.

वर्गातील शिक्षण न झाल्याने परीक्षा नेमक्या घ्यायच्या कशा, यावर सध्या विचार होत आहे. नियोजन समितीने परीक्षेबाबत सूचना करण्याचे जाहीर आवाहनही केले आहे. मुख्याध्यापक संघटनेने परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा निकष 35 टक्क्याऐवजी 25 टक्के करण्याची शिफारस केली आहे.

Related Stories

‘मला तेवढाच उद्योग नाही’; पार्थच्या ‘त्या’ ट्विटवर अजित पवारांची प्रतिक्रिया

pradnya p

जागरण-गोंधळ कलाकारांनाही राष्ट्रवादीने पॅकेज द्यावे

Patil_p

महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांची जयंती घरीच साजरी करा : प्रकाश आंबेडकर

prashant_c

सातारा : सामुदायिक फैलावाचा धोका असुन ही नागरिक बिनधास्त रस्त्यावर

triratna

बिहार : एकाच कुटुंबातील पाच जणांनी केली आत्महत्या

pradnya p

‘कोविशिल्ड’ लसीच्या किंमतीत 100 रुपयांची कपात, पुनावालांची माहिती

pradnya p
error: Content is protected !!