तरुण भारत

कर्नाटक : पुढील शैक्षणिक वर्षाला १५ जुलैपासून सुरुवात होण्याची शक्यता

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटक सरकारने शाळांकरिता पुढील शैक्षणिक वर्ष १५ जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे, असे सूचित केले. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी “राज्य सरकार पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जुलैपासून करणार आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती लक्षात घेऊन आम्ही असा निर्णय हेण्याचेर ठरविले आहे. तसेच आम्हाला राज्याती सध्याची कोविड परिस्थितीदेखील ध्यानात ठेवायची आहे, ”असे ते म्हणाले.

मंत्री सुरेश यांनी या वेळी परिस्थितीने उभे केलेले आव्हान मागील वर्षीच्या अनुभवीपेक्षा वेगळे आहे. “निर्णय घेण्यापूर्वी आम्ही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी या विषयावर अधिक चर्चा करू,” असे ते म्हणाले.

मंत्र्यांनी पुढे नमूद केले की खासगी शाळा व्यवस्थापनांकडून सरकारवर दबाव आहे की त्यांना वर्ग १ पासूनच ऑफलाइन वर्ग घेण्यास परवानगी द्यावी. “मागील वर्षी (चालू शैक्षणिक वर्ष) मध्ये ६ वी व त्यापेक्षा अधिक वर्गाच्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन वर्गांना परवानगी देण्यात आली होती परंतु पुढील वर्षासाठी वर्ग १ मधील विद्यार्थ्यांपर्यंत ही वाढ करावी अशी खासगी शाळांकडून मोठी मागणी आहे,” असे त्यांनी नमूद केले.

Advertisements

Related Stories

एका वर्षासाठी वीज दर वाढवू नका : कुमारस्वामी

Abhijeet Shinde

राज्याच्या सीमेवरील जिल्हय़ाचा दौरा करेन

Amit Kulkarni

तीन वर्षात 12.36 लाख बोगस बीपीएल कार्डे रद्द

Amit Kulkarni

बेंगळूर: अभिनेत्री रागिणीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Abhijeet Shinde

केंद्रीयमंत्री सदानंदगौडा यांनी घेतला लसीचा दुसरा डोस

Amit Kulkarni

द्वितीय पीयूसी परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना ‘दीक्षा अॅप’ची होणार मदत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!