तरुण भारत

डंपरच्या धडकेत सांगलीतील तरुणी ठार

प्रतिनिधी / मिरज

सांगली – मिरज रस्त्यावरील वंटमुरे कॉर्नर येथे डंपरने धडक दिल्याने वृषाली वैभव वनखंडे (वय 22, रा. सांगली) या तरुणीचा मृत्यू झाला. गुरूवारी दुपारी हा अपघात झाला. याबाबत डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत वृषाली ही चा चारच महिन्यांपूर्वी विवाह झाला होता.

वृषाली वनखंडे ही गुरूवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मॅस्ट्रो मोटारसायकल (एमएच-10-बीव्ही-8464) घेऊन सांगलीहून मिरजेकडे येत होती. वंटमुरे कॉर्नरजवळ ती आली असता, पाठीमागून येणारी डंपर (एमएच-12-एसएक्स-2117) ने तिला फरफटत नेले. या अपघातात वृषाली हिच्या डोक्याला गंभीर मार लागून ती जखमी झाली. काही नागरिकांनी तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, दुपारच्या सुमारास उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.तिच्या अपघाती मृत्यूने नागरिकात हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisements

Related Stories

अवघ्या साठ रुपयांसाठी इस्लामपुरात दोघांवर खुनी हल्ला

Abhijeet Shinde

सांगली : माडग्याळ येथे व्यापाऱ्याचे घर फोडून पाच लाखांचा मुद्देमाल लंपास

Abhijeet Shinde

पत्नीसह मेहुणीवर कोयत्याने वार, बार्शीत एकावर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात नवे 23 रूग्ण, तर 15 कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

सांगली : २५ हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी व संगणक ऑपरेटरला अटक

Abhijeet Shinde

अपेक्स प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका

Abhijeet Shinde
error: Content is protected !!