तरुण भारत

स्मार्टसिटी अधिकाऱ्याच्या घरात 23 लाख रुपये सापडले

कंत्राटदाराकडून 60 हजाराची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळय़ात

 प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

कंत्राटदाराकडून 60 हजार रुपये लाच स्वीकारताना स्मार्टसिटीचा अधिकारी एसीबीच्या जाळय़ात अडकला असून या अधिकाऱयाच्या घरात 23 लाख 56 हजार रुपये रोख रक्कम सापडली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

स्मार्टसिटी कार्यालयातील जनरल मॅनेजर (टेक्नीकल) सिध्दनायक दोडबसाप्पा नायकर याला अटक करण्यात आली आहे. एसीबीचे पोलीस अधिक्षक बी. एस. नेमगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक जे. एम. करुणाकरशेट्टी, पोलीस निरीक्षक ए. एस. गुदीगोप्प, एच. सुनीलकुमार व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.

रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरू होती. संजीवकुमार नवलगुंद (रा. गणेशनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे. संजीवकुमार हे अपूर्वा कंस्ट्रक्शन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत. स्मार्टसिटी योजनेंतर्गत त्यांनी बस थांब्यांची उभारणी केली आहे. त्याची बिले मंजूर करण्यासाठी सिध्दनायक यांनी 60 हजारांची लास मागितली होती.

त्यामुळे संजीवकुमार यांनी एसीबीकडे धाव घेतली होती. गुरूवारी आपल्या घरात 60 हजारांची लास स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱयांनी सिध्दनायकला रंगेहात पकडले आहेत. या कारवाईनंतर घरात तपासणी केली असता 23 लाख 56 हजार रुपये रोख रक्कम मिळाली असून सिध्दनायक हा मुख्य अभियंता दर्जाचा अधिकारी आहे.

रात्री उशीरापर्यंत त्याची चौकशी करण्यात येत होती. इतकी मोठी रक्कम कोठून आली? याचे मुळ शोधण्याचे कामही अधिकाऱयांनी हाती घेतले असून या संबंधी तरुण भारतने एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱयांशी संपर्क साधला असता अद्या चौकशी सुरू आहे. ती रक्कम कोठून आली? या संबंधी कसलीच माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली नसल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

चित्रपटगृहांमध्ये 100 टक्के प्रेक्षकांना प्रवेश

Amit Kulkarni

हिंडलगा कारागृहात खबरदारी वाढवली

Patil_p

ऐन हंगामात लॉकडाऊनमुळे जनावरांचे बाजार बंद

Patil_p

राज्यात बेंगळुरूमध्ये शुक्रवारी आढळले सर्वाधिक रुग्ण तर २९ जणांचा मृत्यू

triratna

विद्यार्थ्यांनी चौकस वृत्तीने मुलाखतीला सामोरे जावे

Amit Kulkarni

शुभम शेळके यांचा किणये भागात झंझावाती प्रचार

Omkar B
error: Content is protected !!