तरुण भारत

अफगाणिस्तानात सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळले, 9 ठार

काबूल : अफगाणिस्तानच्या मैदान वरदक प्रांतात स्पेशल फोर्सचे एक हेलिकॉप्टर बुधवारी रात्री कोसळले आहे. हेलिकॉप्टरच्या पायलटसह 9 जण या दुर्घटनेत मारले गेले आहेत अशी माहिती अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. क्रॅश लँडिंगमुळे ही दुर्घटना घडली आहे. एमआय-17 हेलिकॉप्टर बिहसूद जिल्हय़ात लँडिंग करत असताना ही दुर्घटना घडली आहे. मृतांमध्ये एक वैमानिक आणि 8 अन्य लोकांचा समावेश असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. हेलिकॉप्टर कोसळण्यासह अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये बॉम्ब फेकण्यात आला आहे. येथील एका शासकीय बसला लक्ष्य करण्यात आले असून यात 3 जणांचा मृत्यू आणि 11 जण जखमी झाले आहेत.

Related Stories

पाकिस्तानने 12 देशांच्या विमान उड्डाणांवर घातली बंदी

datta jadhav

अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या 75 हजारांच्या उंबरठ्यावर

datta jadhav

मॉस्को : 16 बळी

Patil_p

आत्महत्येसाठी कुप्रसिद्ध जंगल

Patil_p

कोरोनावरील भारतीय काढ्याला जपानमध्ये प्राधान्य

datta jadhav

तहव्वूर राणाला अमेरिकेत पुन्हा अटक; भारतात प्रत्यार्पणाची शक्यता

datta jadhav
error: Content is protected !!