तरुण भारत

सक्रीय ग्राहक संख्या जोडण्यात एअरटेल अव्वल

व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकसंख्येत अडीच वर्षांत प्रथमच वाढ : जिओ ग्राहक संख्येत सर्वोच्च

वृत्तसंस्था / मुंबई

Advertisements

निधी आणि ग्राहकांना जोडून ठेवण्याच्या स्पर्धेत दूरसंचार कंपन्या अडकलेल्या आहेत. परंतु या प्रवासात काही प्रमाणात सुधारणा होत असल्याचे संकेत आहेत. यामध्ये एअरटेल ग्राहक संख्येत अव्वल स्थान निर्माण करत आहे. व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांची संख्या मागील अडीच वर्षात प्रथमच वाढली आहे.

जानेवारीमध्ये यांनी 17 लाख ग्राहक जोडले होते. ऑगस्ट 2018 मध्ये व्होडाफोन आणि आयडिया एकत्र आले आहेत. त्यानंतर प्रथमच अशी स्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.

साधारणपणे दूरसंचार कंपन्यांपैकी जिओ आजही पहिल्या स्थानी असून यांची एकूण ग्राहकांची संख्या 41 कोटी आहे. एअरटेलची एकूण ग्राहक संख्या ही 34.46 कोटी, तर व्होडाफोनची ग्राहक संख्या 28.6 कोटी आहे. भारती एअरटेल सक्रीय (ऍक्टीव्ह) ग्राहकांच्या संख्येत अव्वलस्थानी असल्याची माहिती आहे. एअरटेलकडे 33.48 कोटी सक्रीय ग्राहक आहेत. जिओचे सक्रीय ग्राहक हे 32.45 कोटीच्या घरात आहेत. व्होडाफोन आयडियाजवळ 25.63 कोटी सक्रीय ग्राहक आहेत. 

वायरलेस ग्राहकांची स्थिती

देशामध्ये एकूण वायरलेस ग्राहकांची संख्या डिसेंबर 2020 मध्ये 115.37 कोटी होती. जानेवारी 2021 मध्ये यामध्ये वाढ होत 116.34 कोटीवर राहिली आहे. टेलीफोनची एकूण ग्राहक संख्या डिसेंबर 2020 मध्ये 117.38 कोटी राहिली असून हा आकडा जानेवारीत 118.34 कोटीवर राहिला आहे. यात आणखी वाढीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Stories

डिसेंबर तिमाहीत येस बँकेला 18,564 कोटी रुपयाचा तोटा

tarunbharat

सिमेंटच्या मागणीत दिसणार वाढ

Amit Kulkarni

कोरोनामुळे शेअर बाजारात मोठी घसरण

tarunbharat

चालू वर्षात अर्थव्यवस्थेत 5.9 टक्क्मयांची घसरण : युएन

Omkar B

रामको सिमेंट्सचा अंतरिम लाभांश घोषित

Patil_p

सेन्सेक्स विक्रमासह सलग सहाव्यांदा तेजीत

Patil_p
error: Content is protected !!