तरुण भारत

शहराचा पारा पोहोचला 35 अंशावर

नागरिक हैराण : बाजारपेठेतही गर्दी कमी दिसू लागली

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

हवामान खात्याने चार दिवसांत पाऊस पडण्याची शक्मयता वर्तविली आहे. त्यामुळे ‘गरिबांचे महाबळेश्वर‘ अशी ओळख असणाऱया बेळगाव शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी कमाल तापमान 34 अंशांवर असणारा पारा आता 35 वर गेला आहे तर किमान 27.7 अंशांवर गेला आहे. त्यामुळे घराबाहेर पडल्यानंतर शरीरातून घामाच्या धारा वाहत आहेत. मागील 15 दिवसांपूर्वी सरासरी तापमान 30 अंशांवर होते. त्यामुळे गारवा व उष्मा असे दोन्ही हवामान नागरिकांना अनुभवावयास मिळत होते. आता मात्र शहरवासियांना उष्म्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कडक उन्हामुळे दुपारीनंतर रस्त्यांवरील गर्दी कमी होऊ लागली आहे. दुपारच्या सत्रात बाजारपेठेतही गर्दी कमी दिसू लागली आहे. तर रात्रीच्यावेळी काहीअंशी थंडी आणि पहाटेच्यावेळी धुके पडत आहे. सकाळपासूनच उष्म्याचा त्रास नागरिकांना होत असून रात्रीच्या वेळीही थंडीचा सामना करावा लागत आहे. शहरात रात्रभर पंख्यांची घरघर सुरू झाली आहे. राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत बेळगाव शहरातील तापमान अल्हाददायक व नेहमीच थंड मानले जाते. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बेळगावच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरात मार्च महिन्यात एवढा उष्मा कधीच नव्हता. मात्र यावर्षी मार्चच्या सुरुवातीपासूनच उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. त्याचा परिणाम आरोग्यावरही होण्याची शक्मयता आहे. पहिलाच कोरोनामुळे मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना हवामानाच्या बदलामुळे आणखी त्रास सहन करावा लागत आहे. उष्म्यात वाढ झाल्यामुळे पंखे, एसी आणि एअरकुलर यांच्या मागणीत वाढ झाली आहे. प्रत्येक जण आर्थिक परिस्थितीनुसार पंखे किंवा एअरकुलर खरेदी करून उष्म्यापासून बचाव करीत आहे. यावर्षी शिवरात्रीनंतर या वस्तुंच्या मागणीत वाढ झाल्याची माहिती व्यापाऱयांनी दिली आहे. उकाडय़ापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना गारवा शोधावा लागत आहे.

Related Stories

ऍड.सुधीर चक्हाणांचा कंग्राळी ग्रामस्थांतर्फे सत्कार

Amit Kulkarni

पायाभरणीपूर्वीच रुग्णालय उभारण्याची घाई

tarunbharat

बेळगाव येथे अधिवेशन नको

Amit Kulkarni

प्रशासकीय सेवेत बेळगावचा सहभाग वाढणे गरजेचे

Omkar B

बेकवाडकर यांच्या चित्रांमधून उलगडले व्यक्ती चित्रातील भाव

Amit Kulkarni

एकनाथ रानडे यांची जयंती विवेकानंद केंद्रातर्फे साजरी

Patil_p
error: Content is protected !!