तरुण भारत

डॉ. कुरणी यांना एनसीसी उपमहानिर्देशकांचे प्रशंसापत्र

प्रतिनिधी /  बेळगाव

येथील एस. के. ई. सोसायटी संचलीत आरपीडी आणि जीएसएस महाविद्यालयाचे एनसीसी  ऑफिसर लेफ्टनंट डॉ. एस. एस. कुरणी यांना कर्नाटक, गोवा संचालनालयाच्या एनसीसी उपमहानिर्देशकांचे प्रशंसा पत्रक जाहीर झाले आहे. डॉ. कुरणी गेली दहा वर्षे एनसीसी ऑफिसर 26 कर्नाटक बटालीयन एनसीसी म्हणून सेवा बजावत आहेत. समर्पित भावनेने केलेल्या अपवादात्मक सेवेचा हा गौरव आहे. संचलनालयाची शान उंचावत आपण अनेक मानसन्मान मिळवून दिलात. आपले हे कार्य एनसीसीच्या इतरांसाठी आदर्शवत आहे असे गौरवोद्गार या प्रशंसा पत्रकात नमूद करण्यात आले आहेत.

Advertisements

 डॉ. कुरणी यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 4 कॅडेट्स सैन्यामध्ये अधिकारी पदावर पोहचले आहेत. 50 हून अधिक जणांनी सैन्यभरतीमध्ये यश मिळविले आहे. एका कॅडेटला सुरक्षा राज्यमंत्री पुरस्कार, एकाला महानिर्देक पुरस्कार तर एकाला मुख्यमंत्री प्रशंसा पत्रक यांनी सन्मानित करण्यात आले आहे. याबरोबरच आरडी परेड एनआयसी आणि टीएससी कॅम्प यामध्ये कॅडेट्सनी उल्लेखनिय सहभाग नोंदविला आहे. या कार्याची दखल घेत हा सन्मान लेफ्टनंट डॉ. कुरणी यांना जाहीर झाला आहे. 26 कर्नाटक बटालियनचे (एनसीसी) कमांडीग ऑफिसर राजीव हातुरीया, ऍडमिनीस्ट्रेटीव ऑफिसर कर्नल आदित्य वर्मा, सुभेदार मेजर लेफ्टनंट महादेव जगताप यांच्यासोबत बटालियनचा सर्व स्टाफ यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

आरपीडी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शोभा नाईक, एस. के. ई. सोसायटीचे सर्व पादाधिकारी, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, संचालक, प्राध्यापक वृंद या सर्वांनी डॉ. कुरणी यांचे विशेष कौतुक केले. सिनीअर अंडर ऑफिसर प्रथमेश पाटील यांना यापूर्वीच सुरक्षा राज्यमंत्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या दुहेरी यशामुळे आरपीडीच्या लौकिकात मोलाची भर पडली आहे.

Related Stories

अलतगा येथे बँक ऑफ इंडियातर्फे जागृती मेळावा

Amit Kulkarni

आम्हाला तातडीने वेतन व भत्ता द्या

Patil_p

1986 च्या हुतात्म्यांना उद्या अभिवादन

Patil_p

परिवहनच्या जानेवारी सिझनवरही पाणी…

Patil_p

रोजगार हमी योजना शेतकऱयांसाठी अडचणीची

Patil_p

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांची ग्रा.पं.ना भेट

Omkar B
error: Content is protected !!