तरुण भारत

भाजपच्या ‘त्या’ टीकेला नितीन राऊतांचे प्रतिउत्तर


मुंबई / ऑनलाईन टीम

कोरोनामुळे महावितरणाच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. नुकतच महावितरणने वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांना सोनू तुला वीज बिल भरायचे नाय का? असे म्हणत चिमटा काढला आहे. हे गाणे सोशल मिडियावर चांगले व्हायरल देखील झाले आहे. तसेच थकबाकीदार ग्राहकांना थकबाकी भरण्यासाठी प्रोत्साहित करुन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहनही राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सर्व नागरिकांना केले आहे. मात्र भाजपने ऊर्जामंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधींची उधळपट्टी होत असल्याचा दावा सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. भाजपच्या या टीकेला नितीन राऊत यांनी देखील उत्तर दिले आहे.

Advertisements

भाजप महाराष्ट्र या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन भाजपने निशाणा साधत म्हटले आहे की, ”आमची तिजोरी रिकामी म्हणून बोंबाबोंब करणाऱ्या ठाकरे सरकारच्या उधळपट्टीचा एक नमुना… हे घर आणि कार्यालय आहे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं. या ऐषोरामात अजून काही कसर बाकी असल्यामुळे गोर-गरीब, शेतकरी आणि सामान्यांची वीज तोडण्याची जोरदार मोहीम राज्यात सगळीकडे सुरू असावी !”

नितीन राऊत यांनी भाजपच्या टीकेला उत्तर देत म्हटले आहे की, माझा जन्म जरी गरीब घरात झाला तरी मी पायलट होतो. त्यावेळीही मी खर्च करु शकत असल्याने मी असाच रहायचो. मला चांगले राहायला आवडते. आताही मी नियमबाह्य कोणतीही गोष्ट केली नाही. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग नियमांच्या अधिन राहून जे काम करत, ते काम सुरू आहे. लोकांना जे समजायचे ते समजावे. फोटोत दिसत असलेला टीव्ही मी माझ्या खर्चाने आणला आहे. माझ्या आधीच्या घरी मोठा टीव्ही होता. तुम्ही इतर मंत्र्यांचे बंगले पाहिले तर ते देखील तसेच आहेत असेही नितीन राऊत यांनी म्हटले आहे.

नितीन राऊत पुढे म्हणाले की, मी दलित समाजाचा व्यक्ती आहे. आम्ही टीकाकारांसाठी सॉफ्ट वेपन असतो. सगळेजण आमच्यावर टीका करतात, आम्ही काही काम करू शकत नाही असा आरोप करतात. आरोप करणाऱ्या बातम्या कोण चालवते हे बघितले पाहिजे. नुसते बातम्या चालवल्याने काही होत नाही, बातम्या बघून पक्षश्रेष्ठी काही माझे खात काढणार नाही. ते माझ्याकडे राहणार आहे, असे स्पष्टीकरणही नितीन राऊत यांनी दिले आहे.

Related Stories

वाढीचा रतीब बंद होईना, मृत्यूदरही घटेना

Patil_p

दुसऱ्याच्या भूमीत घुसून अद्दल घडवण्यास सज्ज

Patil_p

तोडफोड करणारे वंचितचे कार्यकर्ते नाहीत : प्रकाश आंबेडकर

prashant_c

सांगलीवाडीत नागरी वस्तीत शिरलेली अजस्त्र मगर पकडली

triratna

पुणे विभागातील 6 लाख 10 हजार 992 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

पुणे विभागातील 6 लाख 1 हजार 854 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P
error: Content is protected !!