तरुण भारत

विजापूर जिल्ह्यात प्रवेशासाठी कर्नाटकची नाकाबंदी

ताजा कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट तरच प्रवेश, महाराष्ट्र एस टी ला ही कागवाडची सीमा
महाराष्ट्रात येण्यासाठी मात्र खुल्लमखुल्ला

प्रतिनिधी / सांगली

Advertisements

कर्नाटक शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्यातून विजापूर जिल्ह्यात जाणाऱ्या प्रवाशांनी ७२ तासापेक्षा जुना नसलेला आरटीपीसीआर (RT-PCR) निगेटिव्ह रिपोर्ट सोबत ठेवणे आवश्यक आहे. तो असेल तरच प्रवेश अन्यतः नो एन्ट्री आहे. मात्र महाराष्ट्रात येण्याची दारे खुली आहेत.

कर्नाटक शासनाच्या आरोग्य व कुटुंब विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार आरटीपीसीआर निगेटीव्ह रिपोर्ट अनिवार्य आहे. या संदर्भात विजापूर जिल्हा सीमेवर चेक पोस्टची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र परिवहन मंडळाची एस.टी ही सीमेवर रोखण्यात आली आहे. कागवाडच्या पुढे एस.टी.ला प्रवेश नाही.

Related Stories

बोगस सह्या करून बिले उचलणाऱयांवर गुन्हा दाखल करा

Patil_p

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी इच्छुकांची चढाओढ

Patil_p

खासगी व सार्वजनिक आस्थापनांनी कौशल्य विकासच्या वेबपोर्टलचा लाभ घ्यावा

Abhijeet Shinde

बारावी परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत परीक्षा अर्ज भरता येणार

Rohan_P

सह्याद्री प्रकल्पात वाघाचे दर्शन

Abhijeet Shinde

कृष्णा कारखान्याची निवडणूक 26 जूनला?

Patil_p
error: Content is protected !!