तरुण भारत

बाजारातील सलगच्या घसरणीला अखेर विराम !

सेन्सेक्स 642 अंकांनी वधारला -रिलायन्स मजबूत स्थितीत

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

चालू आठवडय़ात सलगपणे पाच सत्रांमध्ये सुरु असणाऱया घसरणीला अखेर आठवडय़ातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी पूर्ण विराम मिळाला आहे. यामध्ये बीएसई सेन्सेक्स 642 अंकांच्या मजबूतीसह निर्देशांक बंद झाला आहे.

दुसऱया बाजूला जागतिक पातळीवरील नकारात्मक कल राहिल्याच्या कारणामुळे आपली हिस्सेदारी कायम ठेवण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले आहेत.

दिवसभरातील चढउताराच्या कामगिरीनंतर सेन्सेक्स 641.72 अंकांनी वधारुन निर्देशांक 49,858.24 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 186.15 अंकांनी वधारुन निर्देशांक 14,744.00 वर बंद झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

दिग्गज कंपन्यांमध्ये सर्वाधिक 4 टक्क्यांनी नफा कमाईत एनटीपीसीचे समभाग राहिले आहेत. यासोबत हिंदुस्थान युनिलिव्हर, पॉवरग्रिड कॉर्प, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट आणि बजाज फायनान्स यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला लार्सन ऍण्ड टुब्रो, टेक महिंद्रा, बजाज ऑटो आणि टायटन चे समभाग घसरणीत राहिले आहेत.

जागतिक पातळीवर आशियासह अन्य बाजारांपैकी शांघाय, हाँगकाँग, टोकीओ आणि सोल हे घसरणीत राहिले होते. परंतु कोरोनाच्या नव्याने वाढत जाणाऱया प्रभावामुळे येत्या काळात गुंतवणूकदारांमध्ये कोणता कल राहणार हे निश्चित करणे सध्या कठीण असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.

घसरणीचा प्रवास खंडित

जागतिक पातळीवरील नकारात्मक वातावरणामुळे देशातील शेअर बाजार मागील पाच दिवस घसरणीमध्ये राहिला होता. परंतु हा प्रवास खंडित करत अंतिम दिवशी शेअर बाजाराने मजबूत उसळी घेतली असल्याची नोंद करण्यात आली आहे.

प्रमुख क्षेत्रांची मजल

जलद विकल्या जाणाऱया ग्राहकोपयोगी वस्तुंच्या कंपन्या (एफएमसीजी), औषध, धातू आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये तेजीचे वातावरण राहिल्यामुळे निर्देशांक मजबूत स्थितीमध्ये राहिले आहेत.

Related Stories

विप्रोच्या सीआयओपदी अनुप पुरोहित यांची नियुक्ती

Patil_p

मारुतीची कार विकत घेणे अधिक सोपे

Patil_p

अजंता फार्माकडून 286 कोटीच्या समभाग पुनर्खरेदीला मंजुरी

Patil_p

सेंच्युरी प्लायचा आंध्रात कारखाना

Patil_p

जानेवारीत 6 आयपीओ येणार बाजारात

Patil_p

पिरामलला मिळाला हिरवा कंदील

Patil_p
error: Content is protected !!