तरुण भारत

‘लेदर’ नाही, आता ‘प्लेदर’

‘आत्मनिर्भर’ भारत या संकल्पेला दृढपणे चालविणाऱयांसाठी हे आणखी एका आनंदाचे वृत्त आहे. कानपूर आयआयटीच्या विद्यार्थी-विद्यार्थींनींनी सामुहिक प्रयत्नांमधून एक नव्या प्रकारचं लेदर म्हणजे कातडं विकसीत केलं आहे. त्यांनी एक स्टार्टअप कंपनी स्थापन केली असून या कातडय़ाचं उत्पादन सुरू केलं आहे. त्याचं नाव त्यांनी प्लेदर असं ठेवलंय. याचं वैशिष्टय़ असं की ते निर्माण करण्यासाठी प्राण्यांची हत्या करावी लागत नाही.

या प्रकल्पाचा महत्वाचा संशोधक आहे अंकित अग्रवाल. प्लेदरसाठी जो कच्चा माल लागतो, तो प्राण्यांपासून नव्हे, तर झेंडू, गुलाब आणि इतर वनस्पती व फुलांपासून तसेच फुलझाडांपासून काढला जातो. या फुलांचा आणि झाडांचा अर्क (एंझाइम्स) यासाठी उपयोगात आणला जातो. या अर्कावर विशिष्ट प्रक्रिया करून हा कच्चा माल मिळविला जातो आणि त्याच्यापासून हे प्लेदर बनविले जाते. त्याचा नैसर्गिकरित्या निचराही होतो. त्यामुळे त्यापासून पर्यावरणाला कोणतीही हानी पोहचत नाही. शिवाय त्याची शक्ती प्राण्यांपासून मिळविलेल्या कातडय़ापेक्षा जास्त आहे. त्यातून मिळणारी ऊबही जास्त आहे. त्यामुळे अलिकडच्या काळात जर्मनी, फ्रान्स, इटली, नेदरलँडस् इत्यादी देशांमध्ये ते निर्यात केले जात आहे.

Advertisements

Related Stories

#WestBengalElections2021:पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात

triratna

कोरोना : दिल्लीत रुग्णांनी ओलांडला 6.33 लाखांचा टप्पा

pradnya p

दिल्लीसह 7 राज्यात बर्ड फ्लूचे संक्रमण

Patil_p

कुख्यात गुंड विकास दुबेचा साथीदार पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार

datta jadhav

संरक्षण क्षेत्राच्या पदरी निराशाच

Patil_p

18 फेब्रुवारीला शेतकऱयांचा ‘रेलरोको’

Patil_p
error: Content is protected !!