तरुण भारत

अमेरिकेत मेगा रॉकेटची चाचणी यशस्वी

वॉशिंग्टन / वृत्तसंस्था

‘नासा’ या अमेरिकन अंतराळ संस्थेने मेगा रॉकेट बनविले असून शुक्रवारी त्याची यशस्वी चाचणी करण्यात आली. मिसिसिपी स्टेट स्पेस सेंटरमध्ये ही चाचणी पार पडली. यापूर्वी या रॉकेटची चाचणी अनेक कारणांनी पुढे ढकलली होती. हे रॉकेट जगातील सर्वात ताकदवान रॉकेट असल्याचे सांगितले जात आहे. नोव्हेंबरमध्ये या रॉकेटचे प्रक्षेपण केले जाणार असून सध्या त्याच्या जोरदार चाचण्या घेतल्या जात आहेत. या रॉकेटच्या निर्मितीसाठी 1.35 लाख कोटी इतका खर्च करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. ‘नासा’ सध्या मानवरहित चंद्रस्वारीच्या तयारीत आहे. आर्टेमिस मिशन असे या मोहिमेचे नामकरण केले गेले आहे. भविष्यात याच्या माध्यमातून अंतराळवीरांना चंद्रावर पोहोचविले जाणार आहे. त्यासाठी ही रॉकेट सिस्टीम उपयुक्त ठरणार आहे.

Advertisements

Related Stories

एअरटेलच्या मोबाइल ग्राहकांमध्ये घट

Patil_p

अंतराळ विश्वात भारत क्रांतीच्या दिशेने!

Patil_p

हिमाचलमध्ये मलेशियाच्या महिलेचा मृत्यू

Patil_p

भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या पदाधिकाऱयाला सुनावले

Patil_p

विदेशात स्थायिक होण्यासाठी भारतीय उतावीळ

Patil_p

बिहारमध्ये 15 मेपर्यंत लॉकडाऊन : मुख्यमंत्री नितीश कुमार यांची घोषणा

Rohan_P
error: Content is protected !!