तरुण भारत

शरथ कमल, मुखर्जी ऑलिम्पिकसाठी पात्र

वृत्तसंस्था/ दोहा

येथे सुरू असलेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता टेबल टेनिस स्पर्धेत भारताचे अचंता शरथ कमल आणि सुतीर्था मुखर्जी यांनी टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट आरक्षित केले आहे.

Advertisements

येत्या जुलै महिन्यात होणाऱया टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरणारा भारताचा शरथ कमल हा पहिला पुरुष टेबल टेनिसपटू आहे. दोहामधील सुरू असलेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्र फेरीच्या टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या दक्षिण आशिया गटातील राऊंड रॉबिन पद्धतीच्या सामन्यात शरथ कमलने पाकच्या मोहम्मद रमीजचा 11-4, 11-1, 11-5, 11-4 अशा गेम्समध्ये पराभव केला. शरथ कमलने हा सामना 22 मिनिटांत जिंकला.

महिलांच्या विभागात भारताच्या एस. मुखर्जीने आपल्याच देशाच्या टॉप सीडेड मनिका बात्रावर 7-11, 11-7, 11-4, 4-11, 11-5, 11-4 अशा (4-2) गेम्समध्ये मात करत टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळविले. या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या दक्षिण आशिया गटातील पहिल्या सामन्यात शरथ कमलला भारताच्या जी. साथियानकडून 9-11, 13-15, 11-5, 11-7, 12-10, 9-11, 8-11 अशा गेम्समध्ये हार पत्करावी लागली होती. पण त्यानंतर पाकच्या मोहम्मद रमीजवर विजय मिळविल्याने तो टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. भारताचा टॉप सीडेड पुरुष टेबल टेनिसपटू शरथ कमलने आशिया कोटय़ातून ऑलिम्पिकची पात्रता सिद्ध केली आहे. आता शरथ कमल चौथ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत आपला सहभाग दर्शविणार आहे.

मिश्र दुहेरीच्या विभागात भारताचा शरथ कमल आणि मनिका बात्रा यांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविताना कतारच्या मोहम्मद अब्दुल वहाब आणि मेहा फेरामर्जी यांच्यावर 11-6, 11-6, 11-2, 11-3 अशी मात केली. शरथ आणि मनिका यांना पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. आता उपांत्यफेरीत शरथ आणि मनिका यांची लढत सिंगापूरच्या कोएन पेंग इन आणि ई लिन यांच्याबरोबर होणार आहे. दक्षिण आशिया गटातील पुरुष एकेरीचा राऊंड रॉबिन विभागातील साथियान आणि मोहम्मद रमीज यांच्यात शेवटचा सामना होणार आहे. ऑलिम्पिक पात्रतेसाठी साथियानला आता केवळ एका विजयाची जरुरी आहे.

Related Stories

अंकिता रैना दुहेरीत पराभूत

Patil_p

गोपीचंदसह 4 प्रशिक्षक उपलब्ध करुन द्या

Patil_p

एटीपी मानांकनात नदाल तिसऱया स्थानी

Patil_p

स्टार मुष्टियोद्धा विजेंदर सिंगची विजयी परंपरा अखेर खंडित

Patil_p

आगामी आयएसएल स्पर्धा बंदिस्त स्टेडियममध्ये होणार

Patil_p

पोस्टल कुस्ती स्पर्धेत चंद्रशेखर शिंदे यांना कांस्यपदक

datta jadhav
error: Content is protected !!