तरुण भारत

मंत्र्यांच्या गनमॅन-वाहन चालकामध्ये क्षुल्लक कारणावरून मारामारी

बेंगळूर : आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांचा गनमॅन आणि खासगी वाहनचालक यांच्यामध्ये शुक्रवारी मारामारी झाली. यामुळे बेंगळूरमधील मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर काही वेळ गोंधळ निर्माण झाला. शुक्रवारी चहा विकणाऱया दिव्यांगाला मंत्र्यांचा गनमॅन तिम्मय्या याने मारहाण केली होती. त्याला कारचालक सोमशेखरने आक्षेप घेतला होता. याच मुद्दय़ावरून शुक्रवारी सकाळी उभयतांमध्ये जुंपली. या प्रकारामुळे डॉ. सुधाकर यांनी तिम्मय्याला बोलावून चांगलेच फैलावर घेतले. याविषयी प्रतिक्रिया देताना मंत्री सुधाकर यांनी, बेशिस्त वर्तन केलेल्या गनमॅन तिम्मय्या याला त्याच्या यापुर्वीच्या खात्याकडे पाठवून देण्यात येईल, असे सांगितले. गनमॅन तिम्मय्या याला सोमशेखरने दिलेला सल्ला पचनी पडला नाही. त्यामुळे त्याने शुक्रवारी सकाळीच सोमशेखरशी वाद उरकून काढला. यावेळी उभयतांमध्ये खडाजंगी झाली. कोणीच माघार घेत नसल्याने भांडणाचे पर्यवसान मारामारीत झाले.

Related Stories

राज्यात 5 हजार केंद्रांमध्ये लसीकरण

Amit Kulkarni

कर्नाटकात पहिले चॉकलेट पार्क होणार

Abhijeet Shinde

बेंगळूर: व्ही. के. शशिकला कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

Pegasus spyware: कर्नाटक काँग्रेसचे आंदोलन; शिवकुमारांसह नेते पोलिसांच्या ताब्यात

Abhijeet Shinde

सोमवारी 32 हजारहून अधिक कोरोनामुक्त

Amit Kulkarni

मंगळूरमध्ये 45 विद्यार्थ्यांना कोरोना

Amit Kulkarni
error: Content is protected !!