तरुण भारत

म.ए.समिती कार्यकर्त्यांचा‘तो’ खटला पुन्हा पुढे ढकलला

पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

लाल-पिवळय़ाविरोधात धर्मवीर संभाजी चौक येथे आंदोलन करणाऱया म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी पाचवे दिवाणी न्यायालय आणि दंडाधिकारी न्यायालयामध्ये सुरू आहे. शुक्रवारी या खटल्याची सुनावणी होणार होती. मात्र, ती पुन्हा पुढे ढकलण्यात आली असून 5 मे रोजी होणार आहे.

प्रादेशिक आयुक्त कार्यालयासमोर असलेला तसेच इतर ठिकाणी असलेले लाल-पिवळय़ा रंगाचे अनधिकृत ध्वज हटवावेत या मागणीसाठी म. ए. समितीचे तालुका सरचिटणीस मनोज पावशे, सूरज कणबरकर, अजित कोकणे, सुधीर कालकुंद्रीकर, नारायण किटवाडकर, सतीश गावडोजी आणि दिवंगत द्वारकानाथ उरणकर यांनी आंदोलन केले.

लोकशाही मार्गाने आंदोलन करताना पोलिसांनी मात्र या सर्वांवर कॅम्प पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल केला. कन्नड आणि मराठी भाषिकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत हा गुन्हा नोंदविला. या खटल्याची सुनावणी सुरू आहे. आता ही सुनावणी पुन्हा पुढे ढकलली असून म. ए. समिती कार्यकर्त्यांच्यावतीने ऍड. महेश बिर्जे काम पाहत आहेत. 

Related Stories

मनपासमोर कचरा टाकणाऱयांकडून दंड वसूल

Patil_p

युवकांच्या सुदृढतेसाठी सौमेश करतोय सायकलप्रवास

Patil_p

शहापूर येथील माय-लेक दहा दिवसांपासून बेपत्ता

Amit Kulkarni

रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत कोरोना रुग्णाचा रस्त्यावरच मृत्यू ; आयुक्तांनी रूग्णाच्या कुटूंबियांची भेट घेत व्यक्त केली दिलगिरी

Abhijeet Shinde

कागवाड, अथणी तालुक्यात कोरोनाचा आलेख घसरला

Omkar B

खरीप हंगामापूर्वी शेतकऱयांना मार्गदर्शन करणे आवश्यक

Patil_p
error: Content is protected !!