तरुण भारत

कोल्हापूर : हस्तीदंत तस्करीचे ‘कोतोली ते शिमोगा’ कनेक्शन..!

वन विभागाकडून हस्तीदंत तस्करी प्रकरणी तिघांना अटक, 5 दिवस कोठडी,
हस्तीदंत तस्करी टोळीत आणखी दोघांचा संशय, दोघांच्या शोधासाठी वन विभागाकडून हालचाली
तस्करीत केरळ-कोल्हापूर-कर्नाटक अशी आंतरराज्यीय टोळीची शक्यता

कृष्णात पुरेकर / कोल्हापूर

Advertisements

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर सोनतळीनजीक वन विभागाच्या भरारी पथकाने आठ दिवसांपुर्वी १ किलो हस्तीदंत पकडले. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. या गुन्ह्यात आणखी दोघांचा समावेश आहे. यामध्ये एक पन्हाळा तालुक्यातील तर दुसरा कर्नाटकातील आहे. त्यामुळे वन विभागाचे भरारी पथक आता हस्तीदंत तस्करीतील कोतोली ते शिमोगा कनेक्शनचा शोध घेत आहे. या टोळीत वन गुन्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असण्याची शक्यता आहे. हस्तीदंत तस्करी प्रकरणात ५ जणांची टोळी उघडकीस येण्याची शक्यता आहे.

संशयित माणिक इनामदार (वय 59, रा. परळी निनाई), सागर साबळे (वय 32, रा. माले) आणि धनंजय जगदाळे (वय 21, रा. शिंगणापूर) यांना 10 मार्चला सायंकाळी वन विभागाच्या भरारी पथकाने सोनतळी (ता. करवीर)  येथे पकडले. त्यांच्या इनोव्हा कारची झडती घेता त्यात केरळ येथून विक्रीसाठी आणलेले 1 किलो हस्तीदंत मिळून आले. भरारी पथकातील वनाधिकारी युवराज पाटील, सचिन डोंबळे, गजानन भोसले, रॉकी देसाई, दीपक गायकवाड, विजय भोसले, आदींच्या पथकाने संशयितांना अटक करत इनोव्हा कारसह, मोटारसायकल, हस्तीदंत, 3 मोबाईल जप्त केले. संशयित तिघे सध्या पोलीस कोठडीत आहेत.

हस्तीदंत तस्करीतील संशयितांनी चौकशीत तपास पथकाला धक्कादायक माहिती दिली. यामध्ये हस्तीदंताबद्दल आपल्याला माहिती नाही. पण पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथील एकाच्या सांगण्यावरून आपण ते शिमोग्याला घेऊन निघालो होतो. तेथे प्रेम नावाच्या तरूणाला भेटायचे होते, ही व्यक्ती ते अन्य कोणाला तरी देणार होती, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, कोतोलीतील संशयित सध्या ऊस तोडणीसाठी बाहेरगावी आहे, त्याचे मोबाईल कनेक्शन मिळाले आहे, या संशयितावर भरारी पथक लक्ष ठेवून आहे. कोतोलीतील संशयित हाती येताच हस्तीदंत कोठे जाणार होते, याची माहिती मिळणार आहे.

कोतोलीतील या संशयिताला शिमोग्यातील प्रेम हा तरूण भेटला होता. त्यामुळे हस्तीदंत तस्करीतील कोतोली ते शिमोगा कनेक्शन समोर आले आहे. तसेच हस्तीदंत तस्करी प्रकरणी तिघांना अटक झाली आहे. आता या दोन संशयितांमुळे तस्करीत 5 जणांची टोळी सक्रीय असल्याचे समोर आले आहे. तसेच हस्तीदंत तस्करीत केरळ-कोल्हापूर-कर्नाटक असे तीन राज्यांतील कनेक्शन पुढे आले आहे. जिल्हÎात यापुवींच्या वनगुन्हÎांत स्थानिकांचा सहभाग दिसून आला होता. आता हस्तीदंत तस्करीतून तो पुन्हा समोर आल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली.

Related Stories

पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे निधन

triratna

लहान भावाच्या निधनाचे वृत्त समजताच मोठ्या भावानेही सोडला प्राण!

Shankar_P

शिरोळ तालुक्यातील सरपंच निवडणुका पुढे गेल्याने इच्छुकांची घालमेल वाढली

triratna

कोरोना महामारीतही ‘मृत्यू दरात घट’..!

triratna

कुदनूरच्या सेवा संस्थेला सभासदांनी ठोकले टाळे

triratna

रुईतील शेतकऱ्याचा मुलगा बनला धर्मादाय सह आयुक्त

Shankar_P
error: Content is protected !!