तरुण भारत

दिल्लीत कोरोनाबाधितांनी ओलांडला 6.47 लाखांचा टप्पा

  • दिवसभरात 813 नवे रुग्ण ; 2 मृत्यू 


ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीतील कोरोना रुग्णांनी 6.47 लाखांचा टप्पा पार केला आहे. आज दिवसभरात दिल्लीत 813 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 47 हजार 176 वर पोहचली आहे. यामधील 3,409 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Advertisements


दिलासादायक बाब म्हणजे कालपासून 567 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 32 हजार 797 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10,955 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 37 लाख 42 हजार 763 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 46,292 आरटीपीसीआर टेस्ट आणि 29,596 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. 


सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 4.71 % आहे. तर 712 झोन आणि 333 कंट्रोल रूम आहेत.

Related Stories

सुरतमध्ये मजुरांची पोलिसांवर दगडफेक

Patil_p

पेट्रोल-डिझेल दरात किरकोळ कपात

Patil_p

राज्यात दिवसभरात 51 जण संसर्गमुक्त

Patil_p

आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन

Patil_p

चीनमधील भारतीय प्रजासत्ताकदिनाचा कार्यक्रम रद्द

prashant_c

‘कोरोना’च्या सावटाखाली विधेयकांचा पाऊस

Patil_p
error: Content is protected !!