तरुण भारत

सांगली : इस्लामपुरातील बंड्या कुटे टोळीला मोका

प्रतिनिधी / इस्लामपूर

इस्लामपूर येथील नेहरुनगर मधील राजेश सुभाष काळे (३५) याच्या खून प्रकरणातील संदीप उर्फ बंडया कुटे टोळीला पोलीसांनी मोका लावला. या टोळी विरुध्द खून, घरफोडी, महामार्ग लूटमारीसह पाच गुन्हे दाखल आहेत. बंडया कुटेसह या टोळीत तिघांचा समावेश असून इस्लामपूर व आष्टा शहरातील ही सातवी मोकाची कारवाई आहे. संदीप उर्फ बंडया शिवाजी कुटे (२२,रा.लोणारगल्ली), ऋतिक दिनकर महापूरे(२१, खांबेमळा) व अनिल गणेश राठोड(२६,रा.लोणारगल्ली इस्लामपूर, मुळ रा.ऐनापूर एलटी, ता.विजापूर), अशी आरोपींची नावे आहेत.

जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम व अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर पोलीसांनी ही कारवाई केली. दि. ८ मार्च रोजी रात्री या टोळीने खिशातील पैशाची लूट करण्यासाठी कचरेगल्लीतील दारुच्या दुकानाबाहेर पडलेल्या काळे याला मोटारसायकलवरून कापूसखेड रस्त्याला नेले. ओसवाल यांनी विकसित केलेल्या प्लॉटमध्ये लोखंडी रॉड व दगडाने ठेचून त्याचा खून केला. दरम्यान त्याच्या खिशातील पैशाचे पाकिट लंपास केले. आरोपी खून करून कापूसखेड नाका मार्गे शिराळा नाक्यावरुन ख्रिश्चन बंगला परिसरातील मैदानावर काही काळ थांबले. त्यांनी हे पैशाचे पाकिट राठोड याच्याकडे दिले. पोलीसांनी १५०० रुपये व त्यामध्ये मृताचे आधार कार्ड असणारे पाकिट हस्तगत केले. या गुन्ह्याचा तपास करणे पोलीसांच्या दृष्टीने आव्हानात्मक होते. सुरुवातीस काही तास मृत काळेची ओळख पटली नव्हती. तर हा खून रात्रीच्या वेळी झाल्याने कसलाच सुराग नव्हता. मात्र पोलीस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे व पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी शहरातील सिसिटीव्ही फुटेज मधून हा खून उघडकीस आणला. फुटेज मध्ये आरोपींचे चेहरे अस्पष्ठ दिसत होते.

पण आरोपींच्या कपडयांचे रंग व दुचाकी वरुन या खूनाला वाचा फुटली. या टोळीवर अनेक गंभीर गुन्हे आहेत. पोलीस निरीक्षक देशमुख यांनी या टोळी विरुध्द जिल्हा पोलीस प्रमुख गेडाम यांच्या मार्फत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे मोकाचा प्रस्ताव पाठवला. त्यांनी अवलोकन करुन या प्रस्तावास मंजूरी दिली. या गुन्हयाचा तपास पोलीस उपाधिक्षक पिंगळे करीत आहेत. इस्लामपूर उपविभागातील सातव्या टोळीला मोका लागल्याने संघटीत गुन्हेगारीवर वचक निर्माण झाला आहे.

Advertisements

Related Stories

ऑपरेशन ऑल आऊट मोहिमेतील संशयितांकडून चोरीचे गुन्हे उघड

triratna

नवे चार पॉझिटिव्ह, बरे होणाऱ्यांचे शतक पूर्ण

triratna

सांगली : पदवीधर निवडणुकीत राजकीय पक्षांचा शिरकाव क्लेशदायक

triratna

कडेगावच्या सर्वांगीण विकासासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर

triratna

दोन लाखांच्या लाचप्रकरणी पोलीस नाईकासह दोघांना अटक

triratna

”मुख्यमंत्री राज्याचे की फक्त मुंबईचे?”

triratna
error: Content is protected !!