तरुण भारत

पुढील आठवडयानंतर आंबा दर कमी होणार

प्रतिनिधी / कोल्हापूर

गत आठवड्यापेक्षा या आठवड्यात हापूस आंब्याची आवक कमी होऊन, मागणीही वाढली आहे. या मागणीमुळे हापूस आंब्याच्या दरात डझनमागे 50 ते 100 रूपयांनी दर वाढून आहे. पुढील आठवडयात दुसऱया तोडणीचा आंबा बाजारात येणार असल्याने हा दर कमी होणार आहे असे आंबा व्यापाऱ्याकडून सांगण्यात आले.

मार्च महीन्यापासून बाजारात हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. एक व सव्वा डझनचा बॉक्स 600 ते 800 रूपये असा होता. यानंतर आवक वाढल्याने हा दर उतरू लागला. प्रतवारीनुसार 200 ते 600 रूपये डझन असा होता. पहील्या तोडणीचा आंबा संपत आल्याने तसेच दुसऱया तोडणीचा आंबा पुढील आठवडयापासून बाजारात येणार आहे. ग्रांहकाकडून आंब्याची मागणी जास्त व पुरवठा कमी असल्याने हा दर वाढला आहे.

शनिवारी मार्केट यार्डच्या फळ मार्केटममध्ये 25 पेटी व 4800 बॉक्स आंब्याची आवक झाली आहे.सरासरी पेटीचा दर 2000 तर बॉक्सचा दर 450 रूपये असा होता. पुढील आठवडयानंतर आंब्याची आवक वाढणार असल्याने हा दर पूर्ववत कमी होणार असल्याचे सांगण्यात आले.
पुढील आठवडयानंतर आंबा दर उतरणार -प्रसाद वळंजू,आंबा व्यापारी

ग्राहकांची वाढती मागणी व पुरवठा कमी असल्याने तसेच पुणे,मुंबई येथे आंब्याला चांगला दर मिळत असल्याने कोल्हापूर मार्केटमध्ये आंब्याची आवक घटली आहे. यामुळे आंब्याची दरात डझनामागे 50 ते 100 रूपयांनी वाढ झाली आहे.

Advertisements

Related Stories

कोल्हापूर : विजेच्या धक्क्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

Abhijeet Shinde

ग्रंथाच्या माध्यमातून साहित्याची मेजवानी : प्रा. लक्ष्मणराव ढोबळे

Abhijeet Shinde

कोल्हापुरात सोमवारी रस्ता केला अन् मंगळवारी खोदला !

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णात उच्चांकी वाढ, 2599 नवे रूग्ण, 45 बळी, 1622 कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवण्यास प्राधान्य द्या – राजेश क्षीरसागर

Abhijeet Shinde

काळम्मावाडी धरण ९२ टक्के भरले

Abhijeet Shinde
error: Content is protected !!