तरुण भारत

मिरजेत किरकोळ करणातून तरुणाला भोसकले

प्रतिनिधी / मिरज

घरासमोर का थांबला आहेस, असे विचारल्यावरुन झालेल्या वादावादीत अनिकेत चंद्रकांत काशीद (वय 36, रा. मंगळवार पेठ, मिरज) या तरुणाला चाकूने भोसकून जखमी करण्यात आले. शनिवारी रात्री आठच्या सुमारास मंगळवार पेठे येथे ही घटना घडली. याबाबत रात्री उशिरा पर्यंत मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Advertisements

अनिकेत काशीद हा मंगळवार पेठेतील आपल्या घरासमोर थांबला होता. त्यावेळी त्याचे मित्र आले. त्यांनी त्यास तू येथे का थांबला आहेस, असे विचारले. त्यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. माझ्या घरासमोर मी थांबलो असताना तू मला का विचारतोस, असे अनिकेत याने म्हटल्याने मारामारी झाली. त्यावेळी सदर तरुणाने अनिकेत याच्या पोटात चालू भोसकला. यामध्ये तो जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात डाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, चाकू हल्ला झल्यांनातर हल्लेखोर पसार झाले आहेत. रात्री उशिरा पर्यंत त्यांची नावे समजू शकली नाहीत. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. भर वस्तीत हा चाकु हल्ला झाल्याने परिसरात खळबळ माजली होती. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Related Stories

सांगली : शिराळा येथील जेष्ठाचा विहिरीत पडून मृत्यू

Abhijeet Shinde

सांगली : ज्या गावात रूग्ण संख्या जास्त तिथे लक्ष केंद्रीत करा – मंत्री जयंत पाटील

Abhijeet Shinde

सांगली : दिघंचीमध्ये दोन दिवसात 19 रुग्ण आढळले,नागरिकात चिंतेचे वातावरण

Abhijeet Shinde

सांगली : दुरूस्तीसाठी आयर्विन पुल महिनाभर वाहतुकीस बंद

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यातील ११३ कोटींचे रखडलेले प्रकल्प मार्गी

Abhijeet Shinde

मनपाची महिला, बालकल्याण समितीच बरखास्त करा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!