तरुण भारत

सोमवारी येळ्ळूरच्या दोन खटल्यांची सुनावणी

प्रतिनिधी/ बेळगाव

येळ्ळूर मारहाण प्रकरणातील दोन खटल्यांची सुनावणी सोमवार दि. 22 रोजी होणार आहे. तरी सीसी क्रमांक 125 आणि सीसी क्रमांक 126 या गुह्याच्या खटल्याची सुनावणी होणार असून सोमवारी सर्व कार्यकर्त्यांनी न्यायालयामध्ये उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisements

येळ्ळूरच्या वेशीतील महाराष्ट्र राज्य येळ्ळूर हा फलक हटविल्यानंतर पोलिसांनी येळ्ळूरच्या जनतेला अमानुष्य मारहाण केली होती. त्यानंतर येळ्ळूरच्या जनतेवरच गुन्हे दाखल करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी येथील जेएमएफसी व्दितीय न्यायालयात सुरू आहे. सोमवारी आता सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे.

सीसी 125 या खटल्यात अर्जुन गोरल, चांगदेव देसाई, अनंत चिठ्ठी, वृशेषण पाटील, संभाजी हट्टीकर, शिवाजी कदम, सुनील धामणेकर, परशराम कुंडेकर, महेश कानशिडे, अमर पाटील, भैरु कुंडेकर, किरण उडकेकर, मोहन कुगजी, भरमा हलगेकर, रमेश जयराम घाडी, उदय पाटील, विलास यल्लाप्पा पाटील, सागर कुंडेकर, बाबु कणबरकर, रोहित धामणेकर, अनिल धामणेकर, चांगाप्पा मिसाळे, मिथून शहापूरकर, सागर मारुती पाटील, किरण सांबरेकर, सुरज घाडी, विशाल टक्केकर, अमोल जाधव, राजू टोप्पीनकट्टी, अनिल कंग्राळकर, सागर काकतकर, संतोष मेलगे, बाबु मेलगे, मिंटो बेकवाडकर, अरुण गोरल, राहुल अष्टेकर, उमेश सांबरेकर, योगेश मजुकर, अमित पाटील, प्रवीण बागेवाडी यांचा समावेश आहे. या सर्वांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे.

सीसी क्रमांक 126 यामध्ये अर्जुन गोरल, चांगदेव देसाई, अनंत चिठ्ठी, वृशेषण पाटील, संभाजी हट्टीकर, शिवाजी कदम, सुनील धामणेकर, परशराम कुंडेकर, श्रीकांत नांदुरकर, गणेश पाटील, राहुल कुगजी, जयंत पाटील, नागेश बोबाटे, सुनील कुंडेकर, रवळू कुगजी, केशव हलगेकर, सातेरी बेळवटकर, गणपती इराप्पा पाटील, नामदेव नायकोजी, रामचंद्र बागेवाडी, केशव पाटील, रमेश धामणेकर, रामचंद्र कुगजी, सतीश कुगजी यांचा समावेश आहे. या सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ऍड. शामसुंदर पत्तार, ऍड. शाम पाटील, ऍड. हेमराज बेंचण्णावर यांनी केले आहे.

Related Stories

बिडी येथे वीज कोसळून एक जण जखमी

Patil_p

तुम्मरगुद्दी पंपहाऊसमध्ये गळती

Omkar B

सिंधुदुर्ग, विजयदुर्गचा ‘जागतिक वारसा नामांकन’ प्रस्तावाचा स्वीकार

Amit Kulkarni

लस मिळविण्यासाठी उचगावात अरेरावी

Omkar B

दक्षिणमुखी मारुतीला कोरोना दूर करण्यांसाठी गाऱहाणे

Amit Kulkarni

जुने बेळगाव नाका परिसरातील दारू दुकाने बंद करा

Amit Kulkarni
error: Content is protected !!