तरुण भारत

हिंडलगा महालक्ष्मी यात्रेची उत्साहात सांगता

वार्ताहर/ हिंडलगा

हिंडलगा येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवी यात्रेची शनिवारी (दि. 20) हजारो भाविकांच्या उपस्थितीत सांगता करण्यात आली. यावेळी ‘उदो गं आई उदो’, ‘श्री महालक्ष्मी देवीच्या नावानं चांगभलं’चा गजर सुरू होता.

Advertisements

शनिवारी दिवसभर भाविकांनी ओटी भरण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. शिवाय आणखी दोन दिवस यात्रा वाढविण्यात येणार असल्याची अफवा ग्रामस्थांमध्ये पसरली होती. पण, शासनाच्या परवानगीनुसार 16 ते 20 मार्च दरम्यान पाच दिवस यात्रेला परवानगी मिळाली होती. त्यानुसार पाच दिवस ठरल्याप्रमाणे सर्व विधीवत धार्मिक कार्यक्रम पार पाडण्यात आले. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास श्री लक्ष्मी देवीची विधीनुसार पूजा करून गदगेवरून हलविण्यात आले. त्यानंतर भंडाऱयाची उधळण करत धनगरी ढोल वाद्यांच्या गजरात ठरावीक परिसरात देवीची मिरवणूक काढण्यात आली. शेवटी सीमेकडे प्रयाण झाल्यानंतर मोजकीच पंचमंडळी, मानकरी, हक्कदारी व यात्रोत्सव संघाच्या पदाधिकाऱयांच्या उपस्थितीत धार्मिक विधी आटोपून यात्रेची सांगता करण्यात आली. शिवाय पुढील 11 वर्षांनंतर पुन्हा मोठय़ा प्रमाणात लक्ष्मीयात्रा भरविण्याचा निर्णय यात्रोत्सव संघाने घेतला आहे.

लक्ष्मीनगर महिला मंडळातर्फे देवीला सोन्याचा हार

लक्ष्मीनगर येथील शिव-गणेश मंदिर आणि महिला मंडळाच्यावतीने शुक्रवारी श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीला आहेर व सोन्याचा हार देण्यात आला. यानिमित्त वाजतगाजत मिरवणूक काढून श्री लक्ष्मीदेवीचा जयजयकार करण्यात आला. त्यानंतर यात्रोत्सव संघाच्या पदाधिकाऱयांच्या उपस्थितीत देवीला आहेर करून सोन्याचा हार घालण्यात आला.

यावेळी दीपा हंगिरगेकर, गंगा चव्हाण, मल्लव्वा कुडचीकर, रेणू गावडे, वंदना पाटील, कल्पना कडोलकर, ग्राम पंचायत अध्यक्ष नागोश मन्नोळकर यांच्यासह महिला मंडळाच्या पदाधिकारी व रहिवासी उपस्थित होते.

विजयनगर महिला मंडळातर्फे सोन्याचा हार अर्पण

विजयनगर (हिं.) येथील महिलांच्यावतीने श्री महालक्ष्मी देवीला तीन ग्रॅम सोन्याचा तुळशीहार अर्पण करण्यात आला. यानिमित्त एकत्रितपणे ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ग्राम पंचायत सदस्य निर्मलकुमार धाडवे, राहुल हुलजी, भरमा कडोलकर, दीपक कडोलकर, सुप्रिया सूर्यवंशी, गीता कडोलकर, शिवानी निंबाळकर, सुवर्णा कडोलकर, वसुंधरा नांदवडेकर, प्रणाली वरुटे, अनू मोहिते, गीता सोनेर, शोभा कमते, यल्लुताई कडोलकर यांच्यासह महिला व भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

काकती येथील पोलीसाचा अहवाल कोरोना पॉझिटिक्ह

Rohan_P

बस धावल्या पण मोजक्याच

Patil_p

तिसऱया लाटेसाठी बिम्स सज्ज

Amit Kulkarni

बेळगावात मेगा लष्कर भरती

Amit Kulkarni

विनामास्क फिरणाऱयांवर कारवाईचा सपाटा

Patil_p

रस्त्यात सांडपाणी नागरिकांच्या जिवाला धोका

Amit Kulkarni
error: Content is protected !!