तरुण भारत

राज्यात दिवसागणिक रुग्णसंख्येत वाढ सुरूच

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गेल्या२४ तासांत आणि २५ डिसेंबरनंतर एका दिवसात कर्नाटकात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी राज्यात १,७०० च्यावर कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाने जरी केलेल्या बुलेटीननुसार १,७९८ नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. तर १,०३० रुग्ण कोरोनावर विजय मिळवीत रुग्णालयातून घरी परतले आहेत. तर शनिवारी या सात जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान राज्यात आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९,६८,४८७ वर पोहोचली आहे. तर यापैकी ९,४३,२०८ रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. सध्या राज्यात सक्रिय रूग्णांची संख्या १२,८२८ वर पोहोचली आहे. तर कोरोनाने १२,४३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सध्या राज्यात बाधितांची सर्वाधिक संख्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. बेंगळूरमध्ये दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. शनिवारी जिल्ह्यात १,१६६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. जिल्ह्यात सध्या ९०४४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यासह जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४,१६,६३३ वर पोहोचली आहे. यापैकी ४०,०३,०४० रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले आहेत. तर जिल्ह्यात कोरोनामुळे ४,५४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आरोग्य विभागाने राज्यात गेल्या २४ तासांत एकूण ९४,०४३ नवीन नमुन्यांची चाचणी केली ज्यात ६,०१४ जलद प्रतिजैविक आण ८८,०२९ आरटी-पीसीआर चाचण्यांचा समावेश आहे.

Advertisements

Related Stories

सोमवारी 25,311 नव्या रुग्णांची भर

Amit Kulkarni

सेक्स सीडी प्रकरण : विधानसभेत काँग्रेस आमदारांचा गदारोळ

Abhijeet Shinde

कर्नाटकात आतापर्यंत २८ लाखाहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

काँग्रेस आमदार जमीर अहमद खान यांच्या मालमत्तांवर ईडीचे छापे

Abhijeet Shinde

कृष्णेच्या पाण्यासाठी संयुक्तपणे लढा

Patil_p

म्हैसूरमध्ये आयआयएचसी स्थापन करण्याची मागणी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!