तरुण भारत

‘मिसेस चटर्जी व्हर्सेज नॉर्वे’मध्ये झळकणार राणी

जन्मदिनी नव्या चित्रपटाची घोषणा

बॉलिवूडमधील गुणवान आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक राणी मुखर्जीने 21 मार्च रोजी स्वतःचा 43 वा जन्मदिवस साजरा केला आहे. राणीच्या जन्मदिनी नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. राणीच्या पुढील चित्रपटाचे नाव ‘मिसेस चटर्जी व्हर्सेज नॉर्वे’ असेल. या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडियोज, मोनिशा आडवाणी, मधु भोजवानी आणि निखिल आडवाणीची एमे एंटरटेनमेंट करणार आहे. चित्रपटाची कथा एका मातेवर आधारित आहे.

Advertisements

आशिमा छिब्बर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून लवकरच याचे चित्रिकरण सुरू होईल. स्वतःच्या जन्मदिनासोबत राणीने चित्रपटसृष्टीत 25 वर्षेही पूर्ण केली आहेत. तिने 1996 मध्ये बंगाली चित्रपट ‘बियेर फूल’द्वारे अभिनयात पदार्पण केले होते. राणीचा आगामी चित्रपट ‘बंटी और बबली 2’ प्रदर्शित होणार असून यात सैफ अली खान, सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ दिसून येणार आहेत.

Related Stories

झी युवावर पुन्हा जुळून येती रेशीमगाठी

Patil_p

आई कुठे काय करतेमध्ये धक्कादायक वळण

Patil_p

‘आदिपुरुष’च्या चित्रिकरणास मुंबईत प्रारंभ

Patil_p

खिसाच्या दिग्दर्शकाची प्रेरणादायी कहाणी

Patil_p

सटवाईतून उलगडणार नशीबाची नवी गोष्ट

Patil_p

वच्छी म्हणतेय पोलिसांची कदर करा

Omkar B
error: Content is protected !!