तरुण भारत

पदवीच्या तिसऱ्या वर्षातील अभ्यासक्रमांची परीक्षा लांबणीवर

शिवाजी विद्यापीठाचा निर्णय, तांत्रिक कारणांमुळे परीक्षा पुढे ढकलली

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

शिवाजी विद्यापीठांतर्गत पदवीच्या तिसऱया वर्षातील विविध अभ्यासक्रमांची परीक्षा 22 आणि 23 मार्चपासून सुरु होणार होती. पण ही परीक्षा तांत्रिक कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर प्रकटन शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्र.संचालकांनी रविवारी सायंकाळी केले. विद्यापीठाने ऐनवेळी हा निर्णय घेतल्यामुळे याबाबत माहिती नसलेल्या परीक्षार्थींची मोठी गैरसोय होणार असून सोमवारी त्यांना परीक्षा केंद्रावरून हात हालवत माघारी फिरावे लागणार आहे.

शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील ऑक्टोबर, नोव्हेंबर 2020 च्या हिवाळी सत्रातील पदवीच्या तिसऱया वर्षातील बी.ए., बी.कॉम, बी एस्सी, बॅचलर ऑफ फूड टेक्नॉलॉजी ऍण्ड मॅनेजमेंट, बी.एस्सी फूड टेक्नॉलॉजी ऍण्ड मॅनेजमेंट (सत्र 5 व 6) ची परीक्षा 22 व 23 मार्चपासून सुरु होणार होती. पण तांत्रिक कारणास्तव ही परीक्षा लांबणीवर टाकल्याचे विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केले आहे. या परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक लवकरच विद्यापीठ संकेतस्थळावर जाहीर केले जाणार आहे. तसेच इतर अभ्यासक्रमांच्या परीक्षा नियोजित वेळेनुसारच होणार आहेत.

    प्रश्नपत्रिका तयार नसल्यामुळेच विद्यापीठावर नामुष्की

शिवाजी विद्यापीठांतर्गत पदवीच्या तिसऱया वर्षातील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी काही अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकाच तयार झाल्या नसल्यामुळे विद्यापीठावर परीक्षा लांबणीवर टाकण्याची नामुष्की आली आहे.

Related Stories

कराड जनता बँकेच्या मुख्य कार्यालयात ठेवीदारांचा ठिय्या

Abhijeet Shinde

अवैध सुगंधी तंबाखू कारखान्यावर धाड; एकास अटक

Abhijeet Shinde

गडहिंग्लजला 6 लाख 39 हजाराचा अवैद्य देशी दारूचा साठा जप्त

Abhijeet Shinde

हातकणंगले येथे एकाच रात्री तीन घरफोड्या

Abhijeet Shinde

अप्पर पोलीस अधीक्षक बोऱहाडे यांनी स्विकारला पदभार

Patil_p

शासकीय वैद्यकीय अधिकाऱयांचे गुरूवारपासून काम बंद आंदोलन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!