तरुण भारत

कार्वेचे जवान वैभव थोरात राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी/ कराड

जम्मू-काश्मीर येथे उरी सीमेवर कर्तव्य बजावताना सीआरपीएफ जवान वैभव थोरात (कार्वे) यांनी आतंकवाद्याना कंठस्नान घालून पराक्रमाची शर्थ गाजवली. त्यांच्या या शौर्याबद्दल केंदीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते राष्ट्रपती पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले.

Advertisements

     भारत व पाकिस्तान मधील उरी बॉर्डर ही सर्वात संवेदनशील समजली जाते. या मध्यरात्री घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आतंकवाद्यांना वैभव थोरात व युनिटने गोळ्या घालून जाग्यावरच ठार केले. आपले देशसेवेचे कर्तव्य चोख पार पाडले होते. 23 सप्टेंबर 2017 रोजी रात्री 12.30 वाजता सीआरपीएफच्या 53 बटालियनच्या तुकडीला उरी सेक्टरमधील कलगई गावामध्ये पाकिस्तानातून घुसखोरी करून आलेले तीन आतंकवादी लपून बसल्याची बातमी मिळाली. आपल्या बटालियनच्या हत्यारांनी सज्ज असणाऱया टीमसोबत जवान वैभव थोरात यांनी मध्य रात्री ऑपरेशन राबवून त्या भागात घेराबंदी करत आतंकवादी लपलेल्या जागेवर छापा मारला. आतंकवाद्यांना यमसदनी पाठविले. या पराक्रमाबद्दल त्यांना आणि त्यांच्या सहकारी जवानांना राष्ट्रपती पदक आणि पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले.

जवान वैभव थोरात यांना केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स च्या 82 व्या वर्धापन दिनी 19 मार्च 2021 रोजी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात देशाचे गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक सन्मानित करण्यात आले. वडील लान्स नायक कै. शंकर रामराव थोरात यांच्याप्रमाने देशसेवेची ओढ असल्याने ते 2005 मध्ये भरती झाले होते. तेव्हा पासून ते देशसेवा करत आहेत.

Related Stories

सातारा : पर्यटनाची पंढरी पर्यटकांविना ओस

triratna

औंध ऐतिहासिक पद्माळे तळे झाले फुल्ल

Shankar_P

सातारा पालिकेच्या जुन्या इमारतीचा जीर्ण भाग ढासळला

triratna

सचिन वाझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करणार : गृहमंत्री

pradnya p

बीड शेड परिसरातील चार युवकांना कोरोनाची लागण

Shankar_P

शेतमजूर भूमिहीन व छोट्या कुटीर उद्योगांना भरीव अनुदान द्या

Shankar_P
error: Content is protected !!