तरुण भारत

कोरोना देवदूत सन्मान पुरस्काराने बालाजी चिखले यांचा सत्कार

लावणी कलावंत महासंघाच्या वर्धापन दिनानिमित्त वितरण

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

लावणी कलावंत महासंघाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना काळात आरोग्य सेवा दिलेल्या लावणी कलाकार व बायोमेडिकल इंजिनियर बनून रुग्णांची सेवा केलेल्या बालाजी चिखले यांचा कोरोना देवदूत सन्मान-2021 हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम मुंबई, परळ येथील दामोदर नाटय़ सभागृह येथे नुकताच पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपनेते यशवंत जाधव, यामिनीताई जाधव, वर्षा गायकवाड, विजय गिरकर, अभिनेता दिगंबर नाईक, चारुशीला गोलम, अरविंद भोसले यासह मान्यवर उपस्थित होते. चारुशीला गोलम यांच्या हस्ते लावणी कलाकार बालाजी चिखले यांचा शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला लावणी कलावंत महासंघाचे पदाधिकारी यांच्यासह समाधान इंगळे, उदय साटम, शिवाजी शिंदे, शिवाजी तोरणे, संतोष लिंबारे, जयेश चाळके उपस्थित होते.

Related Stories

बॉक्साईट रोडवरील तलाव-उद्यान विकास कामांचा शुभारंभ

Amit Kulkarni

शांताईतर्फे शंकर पाटील यांचा सत्कार

Amit Kulkarni

जिल्हय़ात मंगळवारी 114 नवे कोरोना रुग्ण

Amit Kulkarni

ऑक्सिजनअभावी तरुणाचा तडफडून मृत्यू

Amit Kulkarni

पेरणीपूर्व मशागतीला आला वेग

Amit Kulkarni

पंचायतराज खात्याच्या अधिकाऱयांची बेळगावला भेट

Amit Kulkarni
error: Content is protected !!